Homeताज्या बातम्या

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे कराच

१) धूम्रपान टाळा / दूर राहाधूम्रपान करणाऱ्यांना दृष्टी क्षीण होण्याचा धाेका ४ पट जास्त असतोतंबाखू किंवा कोणत्याही स्वरूपातील धूम्रपानामुळे डोळ्यातील

सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल
जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला
मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने उपोषण करण्याची वेळ:- क्षितिज घुले 

१) धूम्रपान टाळा / दूर राहा
धूम्रपान करणाऱ्यांना दृष्टी क्षीण होण्याचा धाेका ४ पट जास्त असतो

तंबाखू किंवा कोणत्याही स्वरूपातील धूम्रपानामुळे डोळ्यातील मॅक्युलाचे नुकसान होते. दूरदृष्टीसाठी उपयुक्त ठरणारा मॅक्युला हा रेटिनातील भाग आहे. डोळ्यांसंबंधी अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

२) नियमित व्यायाम हवाच
रक्ताभिसरण योग्य राहते, ग्लुकोमाचा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो

व्यायाम करणाऱ्यांना तो न करणाऱ्यांच्या तुलनेत ग्लुकोमाचा धोका २५% पर्यंत कमी होतो. एवढेच नव्हे, तर ग्लुकोमा असेल तर व्यायामामुळे त्याचे उत्तम व्यवस्थापन शक्य होते.

३) फळे, भाज्या, सुका मेवा खा
वाढत्या वयानुसार दृष्टी क्षीण होण्याचा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी होईल

वाढते वय व डोळ्यांचे विकार या २०२१ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार जस्त, तांबे, क व ई जीवनसत्त्वे आणि बीटा केरोटीन अशा विशेष पोषक द्रव्यांच्या सेवनाने वाढत्या वयानुसार दृष्टी क्षीण होण्याचा धोका २५ %पर्यंत कमी होतो.

४) २०-२०-२० नियम पाळा
यामुळे कोरड्या डोळ्यांसारख्या लक्षणांचा धोका ९० %पर्यंत कमी होईल

दीर्घकाळ स्क्रीनवर काम करत असाल किंवा जास्त काळ स्क्रीन पाहण्यात जात असेल तर दर २० मिनिटांनी २० फूट लांबवरच्या खिडकी, झाड, खुर्ची आदी वस्तूंकडे २० सेकंद पाहत राहा. हा नियम पाळल्यास बऱ्याच लक्षणांचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होईल.

COMMENTS