Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न पुन्हा उच्च न्यायालयात

अ‍ॅड. एम. वाय. देशमुख यांचे माहिती

कोपरगाव तालुका ः गोदावरी खोरे अतितुटीचे असुन पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे 80 टी एम सी पाणी तात्काळ गोदावरी खो-यात

भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी
साईनगरीत हार-फुलांच्या विक्रीस सुरवात
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे

कोपरगाव तालुका ः गोदावरी खोरे अतितुटीचे असुन पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे 80 टी एम सी पाणी तात्काळ गोदावरी खो-यात वळविण्यांत यावे या संदर्भातउच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने सर्वोच्च न्यायालय नविदिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली त्याची सुनावणी 2 एप्रिल 2024 रोजी होवुन सर्वोच्च न्यायालयाने आदेश केला की, याबाबत तुम्ही उच्च न्यायालयात जाउन सदरचे आदेश प्राप्त करून घ्यावेत अशी माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे वतीने बाजु मांडलेले अ‍ॅडव्होकेट एम. वाय. देशमुख यांनी दिली आहे.
           याबाबतची माहिती अशी की, उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. परिणामी नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा या प्रादेशिक पाणी वादात पश्‍चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवुन येथील शेती व शेतक-यांना दिलासा द्यावा अशी याचिका सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने मा. ना. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन क्र. 1422/2014, 10464/2015, जनहित याचिका क्रमांक 256/2014 दाखल केल्या त्यावर मेहेरबान कोर्टात सविस्तर सुनावणी होवुन उच्च न्यायालयांने दिनांक 16 मार्च 2016 रोजी आदेश दिला की, सहा महिन्यांच्या आत सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करा, जमिनीचे आलेखन करा, पाण्यांचे क्षेत्रीय वाटप करावे, पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवावे, जायकवाडी जलाशयाची पाणी साठवण क्षमता तपासावी, गोदावरी अभ्यास गट शासनाने नेमला होता तो राज्य शासनांने स्वीकारलेला नसतांनाही त्या रिपोर्टच्या आधारे समन्यायी पाणी वाटप करता येवु शकत नाही, राज्य शासनाने सदरच्या कमिटीचा रिपोर्ट मान्य केलेला नाही, व सदरचा अहवाल एकतर्फी असुन तो समन्यायी पाणी वाटपाच्या तरतुदींशी विसंगत आहे, तसेच ब्लॉकधारक शेतक-यांच्या प्रश्‍नांबाबत उच्च न्यायालयाने योग्य ती बाजु विचारात घेतली नाही, परंतु राज्य शासनाने मेहेरबान कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांन मा. नामदार सर्वोच्च न्यायालय, नविदिल्ली येथे एस.एल.पी कमांक 21241/2017 दाखल केले. त्यावर दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सर्वोच्च न्यायालय यांच्यापुढे सुनावणी झाली. सदर याचिकेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अ‍ॅड एम वाय देशमुख यांनी सविस्तर बाजु मांडतांना म्हणाले की, उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असुन बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना शेतीला पाणी मिळत नाही परिणामी त्यांचे पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होते. नगर नाशिक जिल्हयातील शेतक-यांच्या जमिनी अधिगृहित करतांना 18 एकरापर्यंत जमिनी सिमीत केल्या. नव्याने उच्च न्यायालयासमोर न्यायालयीन बाजू भक्कमपणांने मांडुन हा संघर्ष सोडविता येवु शकतो मात्र यासाठी अनिश्‍चित काळ संघर्ष पुन्हा करावा लागणार असल्यांने तुर्तास सदरच्या निकालाचा वेगळा अन्वयार्थ काढुन कुणीही शेतक-यांना संभ्रमीत करून नये. गोदावरी खो-यातील पाण्यांची तुट भरून काढण्यांसाठी पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाउन बाजु मांडण्यांची मुभा दिलेली आहे.

COMMENTS