Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारणी सांगवी केंद्रात नाविण्य उपक्रम घेणार्‍या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील सारणी सांगवी केंद्राच्या केंद्रप्रमुख डी.एन.दरबारे-काळे यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत.केंद्रात उत्कृष

पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार
जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर २०२४ ला भाजपचा पराभव होईल – अमोल मातेले 
वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू l पहा LokNews24

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील सारणी सांगवी केंद्राच्या केंद्रप्रमुख डी.एन.दरबारे-काळे यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत.केंद्रात उत्कृष्ट काम करणार्‍या उपक्रमशील शिक्षकांना एखादी वस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे.सध्याच्या परिस्थिती ला शहरासह ग्रामीण भागांमध्ये बहुतांश पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतशिक्षण घेण्याकरतापाठवतआहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.काही ठिकाणी विद्यार्थी नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहेत तर काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत जर शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेत गोर गरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले तर पालक वर्ग नक्कीच आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतील या संकल्पनेतून केंद्रप्रमुख डी.एन.दरबारे मॅडम यांनी त्यांच्या केंद्रामधील उत्कृष्ट काम करणार्‍याशिक्षकांना त्यांचा गुण गौरव करून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केल्यामुळे शिक्षक आनंदी होऊन आपल्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करतील अशी संकल्पना केंद्रप्रमुख डी.एन.दरबारे मॅडम यांनी असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.केज तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.बेडसकर साहेब केंद्र प्रमुख दरबारे मॅडम यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात केली.यावर्षी सर्वोत्कृष्ट गुणवत्ता वाढीचा बहुमान श्री.जगताप सर सांगवी, श्री.ढाकणे सर बिक्कड वस्ती,श्रीमती मातथेसुळ मॅडम यांच्यासह उपक्रम शील उपक्रम घेणार्‍या शिक्षिकांनी हा मान पटकावला आहे.तसेच शाळेची गुणवत्ता वाढविल्या बद्दल धसवस्ती,सांगवी,गजानन नगर,बिक्कड वस्ती, हनुमाननगर,एकुरका, पिंपळगाव,सासुरा, विठ्ठलनगर,केदारवस्ती, सारणी या शाळेतील शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी बेडसकर साहेबांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.पुढे बोलताना बिडकर साहेब म्हणाले की,प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र आहे त्यामुळे शिक्षकांनी एकाच चाकोरी मध्ये न शिकविता अध्यापन कृती युक्त व आनंददायी असले की, गुणवत्ता नक्कीच वाढते.  केंद्रप्रमुख दरबारे मॅडम म्हणाल्या शाळा सुव्यवस्थापणहा कार्यक्रम योग्य रितीने राबवा.विद्यार्थांमध्ये मूल्य रुजविणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे राष्ट्रीय मूल्य रुजविण्यात शिक्षकांना यश आले तर भविष्यात मणिपूर सारखे प्रकरण घडणार नाहीत.  वंदेमातरम् गीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS