Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं विमान मुंबईत दाखल

मुंबई प्रतिनिधी - मंगळवारी मुंबई विमानतळावर वेगळच थरारनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सनं रोखलेलं विमान तब्बल

चार हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला l Crime Show | Lo
मालकाचा विश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक | LOKNews24
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने जुगाड प्रेमाचा वेब सिरियल च्या कलाकारांचा सत्कार 

मुंबई प्रतिनिधी – मंगळवारी मुंबई विमानतळावर वेगळच थरारनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सनं रोखलेलं विमान तब्बल 4 दिवसांनंतर मंगळवारी मुंबईत परतलं. 25 डिसेंबरला या विमानाचं पॅरिसच्या वाट्री विमानतळातून उड्डाण झालं आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता ते मुंबईच्या धावपट्टीवर लँड झालं. या विमानातून 276 प्रवासी मुंबईत आले. 

मुंबई विमानतळावर पोहोचताच या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सीआयएसएफनं चौकशीसुद्धा केली. काही प्रवाशांना माध्यमांच्या प्रतिनिधींना गाठलं आणि त्यांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. पण, हे सर्व पाहून प्रवाशांना मात्र तिथून पळ काढला, आणि ते सर्वांच्या नजरा वळवून गेले. उपलब्ध माहितीनुसार हे प्रवासी पंजाब, गुजरात आणि दक्षिण भारतातील असल्याचं कळत आहे. सोमवारी दुपारी हे विमान भारतात येणं अपेक्षित होतं. पण, यामधील काही प्रवाशांनी भारतात येण्यास नकार देत फ्रान्समध्येच शरण मागितली होती. ज्यामुळं प्रकरण चिघळलं आणि भारताच्या दिशेनं होणारं उड्डाण टळलं. 22 डिसेंबरला फ्रान्समधील विमानतळावर इंधन भरण्यासाठी हे विमान पोहोचताच तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती मिळाली.

COMMENTS