Homeताज्या बातम्याविदेश

कोरोनाची लागण झाल्यामुळे लहान मुलीचा गेला आवाज

अमेरिका प्रतिनिधी - कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक

म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, ०२ जून २०२२ | LOKNews24
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 95 टक्के मतदान

अमेरिका प्रतिनिधी – कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती. आता अमेरिकेत असंच एक प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 मुळे एका 15 वर्षांच्या मुलीचा आवाज गेला आहे. अमेरिकेतील एका रुग्णालयात 13 दिवसांपूर्वी या तरुणीला दाखल करण्यात आलं होतं. तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं, तसंच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती. यानंतर हळू-हळू तिचा आवाज गेला. एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस झाला आहे. मासाचुसेट्स आय अँड इअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक रिसर्च केला. यामध्ये हे पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही, तर कोरोनामुळेच झाल्याचा निष्कर्ष समोर आला. पीडियाट्रिक्स नियतकालिकामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे

लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. अशा वेळी, या नव्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. या मुलीला आधी दम्याची लागण झाली होती. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं. मात्र, हे कोरोनामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशाच प्रकारचा गैरसमज इतर रुग्णांच्या बाबतीत देखील होऊ शकतो. त्यामुळे विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.” असं मत या संशोधनाचे मुख्य ऑथर डॅनियल लॅरो यांनी व्यक्त केलं. या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली. मात्र, तरीही तिचा आवाज परत आला नाही. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन विंडपाईपमध्ये छिद्र करण्यात आले, ज्यामुळे तिला पुन्हा पहिल्याप्रमाणे श्वास घेता योऊ लागला.

COMMENTS