Homeताज्या बातम्या

ही मोहीम गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल; आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई : मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष पडताळणी प्रक्रियेबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये, असा इशार

ही मोहीम गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल; आदित्य ठाकरेंचा इशारा
राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट
पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ही केवळ सुरुवात, आगामी अनेक वर्षे देशात भाजप आणि एनडीएचेच शासन राहील – अमित शाह

मुंबई : मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष पडताळणी प्रक्रियेबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ही प्रक्रिया गांभीर्याने घेतली नाही, तर महाराष्ट्रातही इतर काही राज्यांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.

सध्या निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांची पडताळणी मोहीम सुरू आहे. काही राज्यांमध्ये या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेल्याचा आरोप होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री दादर येथील शिवसेना भवनात पक्षाच्या नगरसेवक, माजी नगरसेवक, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी प्रक्रियेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, मतदार यादी पडताळणीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून त्याकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये या प्रक्रियेसाठी कमी कालावधी मिळाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या, असा दावा त्यांनी केला. मात्र महाराष्ट्रात पुरेसा वेळ उपलब्ध असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे कामात लक्ष घालावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांना अद्याप काही वर्षांचा कालावधी असला, तरी स्थानिक स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बूथस्तरीय प्रतिनिधी नियुक्तीवर भर पक्षाकडून १ जून ते १० जून या कालावधीत बूथस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्ती मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक मतदार यादीसाठी प्रतिनिधी नियुक्त करणे आवश्यक असल्याने शाखाप्रमुखांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पक्षाने ही मोहीम हाती घेतल्याचे मानले जात आहे.

COMMENTS