Homeताज्या बातम्याबीड

सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचा विळखा 20 टक्के व्याजदराने नागरिकांचे शोषण, अनेक कुटुंबे अडचणीत

सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, उच्च व्याजदराने होत असलेल्या पैशांच्या वसुलीमुळे सर्वसामान्य नागरिक हैर

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी शिवभक्तांनी केल महाराजांना अभिवादन 
रस्ते व इमारती उपक्षेत्रातील प्रलंबित देयकांसाठी 15 हजार कोटींचा निधी वितरित
जुन्या भांडणाची कुरापत काढून डोक्यात बियरची बॉटल मारून केले गंभीर जखमी
बेकायदा सावकारीच्या पाशातून सुटका कधी? भोर तालुक्याला पडला विळखा



सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, उच्च व्याजदराने होत असलेल्या पैशांच्या वसुलीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही सावकारांकडून नियमबाह्य पद्धतीने तब्बल 20 टक्क्यांपर्यंत व्याज आकारून कर्जवसुली केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू नागरिकांना लक्ष्य करून हे व्यवहार केले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला सहज मिळणार्‍या कर्जाच्या मोहात अनेक कुटुंबे अडकली आणि नंतर व्याजाच्या वाढत्या ओझ्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. काही कुटुंबांना आपली घरे, जमिनी आणि मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्याची वेळ आल्याचेही समोर येत आहे. या सावकारांच्या जाचामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची चर्चा परिसरात आहे. सततचा मानसिक त्रास, धमक्या आणि दबावामुळे काही कुटुंबे रस्त्यावर आल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बेकायदेशीर सावकारकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

COMMENTS