Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारला पुढील आंदोलन पेलणार नाही

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

छ. संभाजीनगर ः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला असून, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेट 24 ऑक्टोबरला संपत असून, तोपर्यंत म

फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

छ. संभाजीनगर ः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला असून, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेट 24 ऑक्टोबरला संपत असून, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता नाहीच. त्यासोबतच मनोज जरांगे यांनी सरकारने त्वरित मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन पेलवणार नसल्याचा इशारा दिला आहे.
सरकारने 30 दिवस मागितले होते, आम्ही 40 दिवस दिले. आता 24 ऑक्टोबरला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच 25 ऑक्टोंबरपासून गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करणार असून प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करु, असे जरांगे पाटील म्हणाले. 25 तारखेपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मराठा समाज एकत्र येऊन कँडल मार्च काढणार असून सर्व गावांमध्ये साखळी उपोषण, आंदोलने करु असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. दोन टप्पे पाडल्याशिवाय न्याय मिळणार नाही. सुरुवातीला हे सरकारला सोपं वाटत असेल पण ते झेपणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी यावेळी दिला. मराठा समाज आजही शांत आहे. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका. सरकारला हात जोडून विनंती आहे, आता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निर्णय घ्यावा. सरकारनेही वेळकाढूपणा करु नये, मराठ्यांनाही सगळे कळत असून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.  

मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिले तर गुलाल भरुन गाड्या येतील. नाहीतर माणसे भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र आंदोलन शांततेत होणार. संपूर्ण देश शांततेचे युद्ध कसे असते हे पाहणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने आमचे लोक आमच्या विरोधात उतरवले आहेत. मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं. कुणीही आत्महत्या करु नये. राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला 40 दिवस देऊन सन्मान केला. आता 25 तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

गावबंदीसह आमरण उपोषणाचा इशारा – मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्या उपोषणादरम्यान, कुठलेही औषधोपचार किंवा वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही. अन्न आणि पाण्याचाही त्याग केला जाईल. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 25 तारखेपासून एकदम कठोर उपोषण केले जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे, नाहीतर आमच्या गावचा सीमाही तुम्हाला शिवू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

COMMENTS