Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली ः नेपाळमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. राजधानी दिल्लीसह एनसीआर, बिहार,

नेपाळ भूकंपाने हादरले! मध्यरात्री ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
राजधानीत दुसर्‍यांदा जाणवले भूकंपाचे धक्के
भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले

नवी दिल्ली ः नेपाळमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. राजधानी दिल्लीसह एनसीआर, बिहार, उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधील जमीन हादरली. त्यामुळे भल्यापहाटे नागरिकांची धावपळ उडाली. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी होती. नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भूकंपाचा केंद्र काठमांडूच्या पश्‍चिमेला सुमारे 55 किलोमीटर असलेल्या धाडिंगमध्ये होता. सुदैवाने या भूकंपात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नेपाळमध्ये घरे कोसळली असून इमारतीला तडे गेल्याची माहिती आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबरलाही नेपाळच्या अनेक भागात 4.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी देखील या भूकंपाचे धक्के भारतात जाणवले होते. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली-एनसीआरसह अनेक भागातील जमीन हादरली होती. दुसरीकडे अगदी आठवडाभरापूर्वीच गेल्या रविवारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्येही जमीन हादरली होती.  भूकंपाची तीव्रता इतकी होती, की अनेक घरांमधील भांड्यांची पडझड झाली होती. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन रस्तावर आले होते. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

COMMENTS