Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा

सकल मराठा समाजाकडून सभेचे आयोजन

संगमनेर ः संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज  बुधवार 22 नोव्हेंबर ररोजी

मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव
सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा
सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे

संगमनेर ः संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज  बुधवार 22 नोव्हेंबर ररोजी दुपारी 3 वाजता जाणता राजा मैदानावर सभा आयोजीत असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीयेथे आमरण उपोषण केले होते. मात्र दिपावली सण सर्वांना आनंदात साजरा करता यावा आणि सरकारला कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी कालावधी देण्यात यावा यासाठी त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले होते. जर सरकारने दि. 24 नोव्हेंबर पर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश दिले आले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे  काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला येथून मनोज जरांगे पाटील थेट संगमनेर शहरात येणार आहे. तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून येणा र्‍या मराठा समाज बांधवांनी सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS