Homeताज्या बातम्या

अकरावी प्रवेशासाठी हवे नामांकित कॉलेज : विद्यार्थ्यांचा अट्टहास

पुणे ः पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावीसाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा अट्टहास यंदाही कायम आहे. याम

फेसबुकवरील मैत्रीतुन जामखेडला हँनिट्रॅप  
नीलम गोर्‍हे यांच्या अडचणी वाढणार ?
मिल्लिया कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम


पुणे ः पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावीसाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा अट्टहास यंदाही कायम आहे. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेशच घेतलेले नाहीत. दोन नियमित प्रवेश फेर्‍यांमध्ये केवळ 38 हजार 975 विद्यार्थ्यांनीच प्रवेश नोंदवला आहे. यामुळे प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची परंपरा कायम राहणार आहे.

राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला होता. त्यामुळे नामांकित व सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमधील स्पर्धा आणखी वाढली. पहिल्या नियमित प्रवेश फेरीत 86 हजार 482 प्रवेशाच्या जागांसाठी 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवले होते. यातील 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रत्यक्षात 30 हजार 735 प्रवेश निश्‍चित झाले.
दुसर्‍या फेरीसाठी 63, 757 जागा उपलब्ध होत्या. यासाठी 35,694 अर्ज होते. त्यात 15,967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यातील 8,240 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याची बाब उघड झालेली आहे. दोन्ही प्रवेश फेर्‍या पूर्ण झाल्यानंतरही 73 हजार 950 एवढ्या प्रवेशाच्या रिक्तच पडल्या आहेत. यात तिसर्‍या फेरीत केवळ 9 हजार 261 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे. यातीलही सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रत्यक्षात प्रवेश घेत नसतात. नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ हा तिन्ही नियमित फेर्‍यात 90 टक्क्यांवरच आहे. तो फारसा खाली आल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविताना नामांकित महाविद्यालयेच प्राधान्याने नोंदवली. पुढच्या फेरीत तरी या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी आस ठेवत विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयात प्रवेश जाहीर झालेले असतानाही ते घेतले नाहीत. नामांकित महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा जवळपास फुल्ल झालेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इतर महाविद्यालयांचा पर्याय निवडावाच लागणार आहे.

COMMENTS