Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकचे शनिवारपासून आयोजन

दोन दिवसीय परीषदेत पोटाचे विकार तज्ज्ञ होणार सहभागी

नाशिक -  इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रॉलॉजी आणि नाशिक गॅस्ट्रॉलॉजी सोसायटी यांच्या वतीने ’महाआयएसजीकॉन’ २०२३ चे आयोजन केले आहे. हे दोन दिवसीय ‘जीआय स

प्रशांत दामलेंचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मान
‘हॅलो’ला विरोध करणाऱ्यांच मतपरिवर्तन करू…
पाकिट चोरल्याच्या संशयातून भर रस्त्यात जमावाकडून महिलेला मारहाण

नाशिक –  इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रॉलॉजी आणि नाशिक गॅस्ट्रॉलॉजी सोसायटी यांच्या वतीने ’महाआयएसजीकॉन’ २०२३ चे आयोजन केले आहे. हे दोन दिवसीय ‘जीआय समिट’ येत्या शनिवार (दि.७ ऑक्टोबर) आणि रविवारी (दि.८ ऑक्टोबर) पाथर्डी फाटा येथील हॉटेल रॅडिसन्स ब्ल्यू येथे पार पडणार आहे. परीषदेत पोटाच्या विकारांसंदर्भातील आजार व  त्यावरील उपचार पद्धतीतील आधुनिक तंत्रज्ञान, इतर विविध विषयांवर मंथन घडविले जाईल, अशी माहिती परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन बोरसे,आयोजन समिती सचिव डॉ.हुसेन बोहरी यांनी पत्रकार परीषदेत दिली. परीषदेत सहभागासाठी डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पत्रकार परीषदेस खजिनदार डॉ.संदीप पाटील, सहखजिनदार डॉ.शरद देशमुख यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

अधिक माहिती देतांना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन बोरसे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे उपचारात आधुनिकता आली असून, यामुळे रुग्णांना दिलासा मिळतो आहे. नाशिकमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्याने गुंतागुंतीच्या आजारांवर येथे यशस्वी उपचार केले जात आहेत. पोटाच्या विकारांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एकत्रित आणत वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देतांना मथंन घडविण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये ही परीषद आयोजित केली आहे. परीषदेत पोटाशी निगडीत उद्भवणारे नवनवीन विकार आणि वेगवेगळ्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती, संशोधन, शोधप्रबंधांचे सादरीकरण केले जातील.

आयोजन समितीचे सचिव डॉ.हुसैन बोहरी म्हणाले, परीषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवरील २७ सत्र आयोजित केले आहेत. यामध्ये काही समुह चर्चा (पॅनल डिस्कशन), सादरीकरण आणि परिसंवादांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परीषदेच्या दुसर्‍या दिवशी १८ विषयांवर त्या-त्या विषयातील तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. परीषदेच्या आयोजनासाठी आयोजन समितीचे सदस्य डॉ.अद्वय आहेर, डॉ.सोहम दोशी, डॉ.प्रतिभा पगार, डॉ.तुषार संकलेचा, डॉ.मंगेश मानगुळकर, डॉ.धवल चोकसी, डॉ.महेश पाटील, डॉ.गौरव बच्छाव, डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.सचिन धांडे हे परीश्रम घेत आहेत.

परीषदेमध्ये व्यापक स्वरुपात होणार चर्चा – जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणारे पोटांचे विकार व त्यांच्यावरील उपचार, औषधोपचाराचे महत्त्व, शल्यचिकित्सकांची भूमिका तसेच उपचार प्रक्रियेत एंडोस्कोपिस्टच्या निदानाचे महत्त्व, रुग्णांमध्ये आजाराप्रमाणे आहारात करावयाचे बदल, शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान यांसह यकृताशी निगडीत व्याधी, यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) नंतर संभाव्य गुंतागुंतींवरील उपचार अशा व्यापक स्वरुपातील विषयांवर परीषदेत मंथन घडविले जाणार आहे

COMMENTS