Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हेगार बसले दिमाखात शैक्षणिक दालनात

जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

डॉ.अशोक सोनवणे अहमदनगर ः आजच्या आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यामुळेच धर्मग्रंथ

भोजडे येथील मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा कौतुकास्पद – विवेक कोल्हेे
समन्यायी कायद्याबाबत आम्ही भांडत होतो तेव्हा ‘ते’ का गप्प होते – ना.थोरात
नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे

डॉ.अशोक सोनवणे
अहमदनगर ः आजच्या आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यामुळेच धर्मग्रंथात स्त्रियांचे महत्त्व ओळखून असेही म्हटले आहे की, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणजेच जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे देवता वास करतात. महिलांमध्ये एवढी शक्ती असूनही त्यांच्या सक्षमीकरणासाठी लढा देण्याची वेळ यावी यासारखे दुर्देव नाही. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे अधिकारी महिलांची छेडछाड विनयभंग करुन गुन्हा दाखल होतो. मात्र प्रशासकीय कारवाई बाजूला ठेऊन आज हेच गुन्हेगार मोठ्या दिमाखात आम्ही त्यातले नाहीच या अविर्भावात येऊन शैक्षणिक दालनात मोठ्या दिमाखात येऊन बसल्यामुळे महिला कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

         शासकीय लोकसेवकांनी अधिकार आणि कर्तव्याशी बांधिलकी स्वीकारायला हवी. लोकसेवकांकडून अपेक्षित पूर्ण सचोटी, निष्पक्षता आणि कर्तव्याची निष्ठा कायम राखणे अपेक्षित आहे. त्यांनी कायद्यानुसार आणि जनतेच्या हितासाठी वागले पाहिजे. कर्मचार्‍यांना सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचे वातावरण प्रदान करण्याच्या वचनबद्धतेसह, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ करण्यास स्पष्टपणे प्रतिबंधित करणे. अधिकार्‍यांने सार्वजनिक आणि खाजगी जीवनात, सेवेची किंवा राष्ट्राची बदनामी होणार नाही अशा पद्धतीने वागणे आवश्यक आहे. यामध्ये नागरी सेवकाचे अशोभनीय मानले जाणारे कोणतेही वर्तन टाळणे समाविष्ट असूनही जिल्हा परिषदेतील शिक्षिकेने गुन्हा दाखल करुन आरोपींवर कारवाई होणार नसेल तर निश्‍चितच मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या कर्तव्यापासुन का बरे दूर पळताय असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील महिलांवर भितीच्या सावटाखाली राहण्याची वेळ आली आहे.

अकोले तालुक्यात अगोदर एका गटशिक्षण अधिकार्‍याचे निलंबन करुन दुसर्‍या निलंबित अधिकार्‍यास पुनःस्थापीत केले आहे. मात्र जिल्ह्यात कुठेही नाही असा उपक्रम या तालुक्यात भास्कर पाटील राबवत असून शिक्षकांना मानसिक त्रास देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाठीमागे पत्रकार परिषदेत घोळक्यात बाजुला उभे असणार्‍या अनेक शिक्षकांत कुंभेफळच्या दोन शिक्षकांचे निलंबन केले. उर्वरीत अकोले तालुक्यातील 15 शिक्षकांचा व्हाट्सअप ग्रुप करुन त्या स्थानिक गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, स्वतः भास्कर पाटील यांचा ग्रुपमध्ये समावेश आहे. त्यात त्या शिक्षकांना दैनंदिन कामकाजाचे हजर असल्याचे फोटो टाकावे लागतात. अशाप्रकारे या पंधरा शिक्षकांवर वेठबिगारीसारखा सूड उगवण्याचा एकछत्री अंमल पाटीलने गाजवण्यास सुरुवात केली आहे. याची खदखद सर्व जिल्हा भरातील शिक्षकांत बघायला मिळत आहे. आरोपींवर प्रशासकीय कारवाई संदर्भात उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना विचारले असता अद्यापतरी कुठलीही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

निलंबित न केल्यास आमरण उपोषणाचा ः शिरसाठ – भास्कर पाटील, संभाजी भदगले यांच्यावर 10 एप्रिल  2024 रोजी पाथर्डी पोलिस स्टेशन मध्ये 354-डि, 506,34,3(1) (थ)(ळ), 3(2) र्(ींर) प्रमाणे गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हा गंभीर असून देखील वरिल व्यक्तीना कामावरून निलंबित केले  नाही. शासकिय कोणत्याही कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल असेल तर त्यांना जो पर्यंत गुन्हा सिध्द् होत नाही तो पर्यत निलंबित करणे बंधनकारक असताना देखिल अद्याप वरील अधिकारी हे कार्यरत आहे वरील व्यक्ती नेमक्या कोणाच्या आशीवार्दाने कामावर रूजू आहे असा मोठाप्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्वरीत निलंबनाची कारवाई केली नाही तर 24 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा विजय शिरसाठ शहर जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई) यांनी दिला आहे.

भास्कर पाटीलला अभय कशासाठी ? – भास्कर पाटील आणि संभाजी भदगले यांचेवर गुन्हा दाखल होऊनही त्यांचेवर कारवाई करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर केवळ शिक्षकांचे निलंबन करण्यापुरतेच सीमित आहे का, याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. आरोपी दालनात बसून डामडौलाने प्रशासकीय कारभार करणार असतील तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. भास्कर पाटीलला गुन्हेगारी नवी नसून पळवाटा चांगल्या माहित असल्यामुळेच शासकीय सेवेत ठाण मांडून आहे. शिक्षकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करण्यासाठी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पाटीलच्या दावणीला बांधलेली आहे. त्यामुळे भास्कर पाटीलला अभय कशासाठी देण्यात येत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

982225475 वर संपर्क साधावा – शिक्षण विभागातील गैरव्यवहारावर बोट ठेवल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील विविध शिक्षकांनी आम्हाला फोन करून आपल्या व्यथा आणि वेदना मांडल्या असून, शिक्षण विभागाकडून आमचा कसा छळ मांडला आहे, त्यासंदर्भात उहापोह केला. शिक्षण विभागातील या सावळ्या गोंधळावर अनेक शिक्षक आपल्या व्यथा आणि वेदना मांडण्यास इच्छूक आहेत त्यांनी 9822254475 या नंबरवर संपर्क साधावा. आम्ही त्यांचे नाव उघड न करता, त्यासंदर्भात शिक्षण विभागाला जाब विचारून आपल्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यास आम्ही बांधील आहोत.

COMMENTS