Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमधून भुजबळांची लोकसभेसाठी माघार

नाशिक ः महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठा पेच दिसून येत होता. शिंदे गटाच्या अर्थात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे लोकसभेसाठी इच्छूक होत

गावबंदी करणार्‍याला तुरुंगात पाठवा : ना. भुजबळांनी सांगितली कायद्यातील तरतूद
पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना सूचना
ना.भुजबळ साहेब! आश्रीत नाही तर बांडगुळांचे वेल उपटा!!

नाशिक ः महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठा पेच दिसून येत होता. शिंदे गटाच्या अर्थात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे लोकसभेसाठी इच्छूक होते, मात्र अचानक छगन भुजबळ यांनी या जागेवर दावा केल्यामुळे आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी भुजबळांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यामुळे गोडसे यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गोडसेंना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसून येत आहे. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, नाशिक मतदारसंघात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी मनापासून आभारी आहे. नाशिक लोकसभेबाबत होळीच्या दिवशी अजित पवारांनी मला बोलावून घेतले. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मला उमेदवारी देण्यासाठी अनुकूल होते, असा दावा देखील भुजबळांनी केला आहे.

COMMENTS