Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

जामखेड प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर झाला असून चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरूणांनी गेल्या 7 दिवसांपासू

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच
धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    

जामखेड प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर झाला असून चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरूणांनी गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा मंगळवारी 7 वा दिवस असून, या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या आरक्षणाकडे सरकारचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून होत आहे.
सात दिवसांपासून अण्णासाहेब रूपनवर, सूरेश बंडगर यांची प्रकृती खालावत आहे. यावेळी उपोषणकर्त्यांच्या साखरेची व रक्तदाबाची पातळी अस्थिर झाली आहे असे आरोग्य तपासणी करणारे डॉक्टरांनी सांगितले. उपोषणकर्त्यांबरोबर पहिल्या दिवसापासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब दोडतले, अक्षय शिंदे, माणिकराव दांगडे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, नंदू खरात, किरण धालपे बसलेले आहेत. राज्यातील विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते या आमरण उपोषणस्थळी भेटी देऊन पाठिंबा देत आहेत. ि13 सप्टेंबर रोजी आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिह राजे होळकर इंदौर, नानापाटील देवकाते पूणे, सक्षणा सलगर युवती प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनूमंत सूळ, रामभाऊ ढेकळे फलटण, राजाभाऊ धायगुडे खंडाळा आदींनी उपोषणस्थळी चौंडी येथे भेटी दिल्या. यावेळी स्वप्निल मेमाने जेजूरी, बाळा गायके परळी, अँड रणजित कारंडे जामखेड यांनी मूंडण करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

सरकारने मात्र उपोषणाकडे फिरवली पाठ – धनगर समाजाचे तरूण गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण करत असून, त्यांची प्रकृती खालावली असतांना देखील, या उपोषणाकडे सरकारने पाठ फिरवली असेच चित्र दिसून येत आहे. कारण गेल्या 7 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून कोणताही लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. उपोषणाच्या पहिल्याच दिवस आमदार प्रा. राम शिंदे यांनी आणि मंगळवारी काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या भेटी वगळत्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना ? अशी खंत कार्यकर्ते उपस्थित करत आहे.

COMMENTS