Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास दीड कोटींचा गंडा

पुणे ः पुण्यातील शिवाजीनगर भागात मॉडेल कॉलनी येथे राहणार्‍या 75 वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास एका फूट वेअर कंपनीत गुंतवणूक करण्याच्

पुण्यात व्यावसायिकाची 52 लाखांची फसवणूक
 पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक
पोलिसांच्या 2 पेट्रोल पंपावर 20 लाखाची फसवणूक

पुणे ः पुण्यातील शिवाजीनगर भागात मॉडेल कॉलनी येथे राहणार्‍या 75 वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास एका फूट वेअर कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तब्बल एक कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर चतु:श्रृगीं पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजेश वसंतराव कारंडे (वय-57 ), लीना राजेश कारंडे, निलेश वसंतराव कारंडे, अपर्णा निलेश कारंडे, लता वसंतराव कारंडे (सर्व राहणार-शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी वसंत यल्लाप्पा कोरेगावकर (वय-75 )यांनी पोलिसांकडे आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2017 ते आत्तापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वसंत कोरेगावकर यांना आरोपी यांनी त्यांच्या कास फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी एक कोटी 55 लाख रुपये जमा करत संबंधित कंपनीत गुंतवणूक केली. त्याबाबत आरोपी यांनी तक्रारदार यांना शेअर्स सर्टिफिकेट दिले असून करारनामा करून पावर ऑफ टर्नी करण्यात आलेली आहे. मात्र, सदर कराराचा भंग करून आरोपींनी तक्रारदार यांची संबंधित रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे .वारंवार पाठपुरावा करूनही पैसे दिले जात नसल्याने अखेर निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास एस जानकर करत आहे.

COMMENTS