Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शिवछत्र परिवार कटिबध्द -विजयसिंह पंडित

मारफळा येथे 1 कोटी 43 लक्ष रुपये किंमतीच्या विकासकामांचा शुभारंभ

गेवराई प्रतिनिधी - सत्ता असो वा नसो सर्वसामान्यांच्या विकासासाठी शिवछत्र परीवार कटिबध्द आहे. यापुढील काळातही विशेष प्रयत्न करुन विकास कामांना गत

आबासाहेबांच्या वसतिगृहामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले
बारावीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर
प्रिया वारियरलाही लागला बोल्डनेसचा चसका; ब्रायडल लूकच्या फोटोशूटने धुमाकूळ (Video)

गेवराई प्रतिनिधी – सत्ता असो वा नसो सर्वसामान्यांच्या विकासासाठी शिवछत्र परीवार कटिबध्द आहे. यापुढील काळातही विशेष प्रयत्न करुन विकास कामांना गती दिली जाईल. विकासासाठी आपणही शिवछत्र परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन आशिर्वाद द्या, असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले. मारफळा येथे 1 कोटी 43 लक्ष रुपये किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे मारफळा येथे जलजिवन मिशन अंतर्गत 88 लक्ष रुपये, पाणी फिल्टर प्लॅन्ट 5 लक्ष रुपये, ग्रामपंचायत भवन 24 लक्ष रुपये आणि पांदन रस्ता 8 लक्ष रुपये अशा 1 कोटी 43 लक्ष रुपये किंमतीच्या विकासकामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी बोलताना विजयसिंह पंडित यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. शिवछत्र परिवाराने विकास कामात कधीही राजकारण केले नाही. भैय्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. सत्ता नसली तरी विकासकामे बंद पढू दिली नाहीत. यापुढील काळातही ते अधिक गतीने केले जातील. येणार्‍या काळात होणार्‍या जि. प. व प. स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. आपण केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. आजपर्यंत जसे आपण शिवछत्र परिवारावर प्रेम केले तसेच यापुढील काळातही करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी उपसभापती शाम मुळे, शब्बीर बेग, कैलास पवार, बाळू राठोड, अनिल राठोड, मोतीराम कदम ,भीमराव कदम, सय्यद मुस्तफा, आसाराम घाडगे, अशोकराव कुटे, विठ्ठलराव कुटे, नारायण डरफे, चंद्रकांत घाडगे, विश्वनाथ कबले, विकास गिरी, दत्ता सोळुंके,अक्षय पवार, गोरख शिंदे, शरद कबले, अमित वैद्य, जयसिंग माने यांच्यासह ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS