Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा 24 तासानंतर सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा

लातूर प्रतिनिधी - तेरणा नदीपात्रात पोहोण्याचा प्रयत्न करताना बुडालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर 24 तासानंतर सोमवारी दुपारी 1 वाजता

अनिल परब यांचे दापोली रिसॉर्ट गैरकायदेशीर : किरीट सोमैया
नगर- दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे नगर तालुका पोलिसांचा वेश्या व्यवसायावर छापा
सत्ता डाकीण मुजोर झाली तर…!

लातूर प्रतिनिधी – तेरणा नदीपात्रात पोहोण्याचा प्रयत्न करताना बुडालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर 24 तासानंतर सोमवारी दुपारी 1 वाजता आपत्ती व्यवस्थापनच्या पथकास सापडला. नातवाचा मृतदेह पाहून आजोबांनी हंबरडाच फोडला.
शाम व्यंकटराव जाधव (18, रा. तळभोग, ता. बसवकल्याण, हमु. गुंजरगा, ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे. शाम जाधव हा मुळचा रहिवासी कर्नाटकातील तळभोग येथील आहे. त्याचे आई- वडिल पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे तो मामाकडे शिकण्यासाठी राहत होता. सध्या तो निलंग्यातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी तो गुजंरगा येथील मामाच्या शेतात आजोबा आणि मामाच्या मुलगासोबत गेला होता. आजोबांनी तेरणा नदी पाञात म्हैस धुतली आणि ते म्हैस चारत पुढे गेले. तेव्हा मामाचा मुलगा गणेश लिंबाजी शिंदे हा नदीपाञातील लोखंडी कलईत बसून गावाकडे गेला. दरम्यान, शाम जाधव हा नदीच्या किनार्‍यालगत पोहत होता. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. विष्णू गित्ते, पोकॉ. अलि शेख, पोलिस पाटील मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे आदींनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने शोध मोहीम राबविली. तेव्हा दुपारी 1 वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून नातेवाईक आक्रोश करीत होते.

COMMENTS