Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप पक्षात घराणेशाहीला स्थान नाही : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपा पक्षात घराणेशाहीला स्थान नाही. इथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. त्यांच्या कामाला महत्व

शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम
महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील विद्युत सहाय्यकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्वगृही; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल; भाजपला मोठा धक्का

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपा पक्षात घराणेशाहीला स्थान नाही. इथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. त्यांच्या कामाला महत्व दिले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपाचे 900 पदाधिकारी काम करत आहेत. सर्वांनी सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा युवा, महिला, किसान मोर्चा व प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक पदाधिकरी निवड बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा व सांगली जिल्हा प्रभारी प्रिया पवार होत्या. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महिला युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषा दशवंत यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी भाजपच्या जिल्हा युवा मोर्चा, किसान मोर्चा, महिला मोर्चा व जिल्हा प्रकोष्ठ, सेलच्या पदाधिकारी निवडी झाल्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, देशाचा प्रमुख प्रामाणिक असल्याने देश विकासात अग्रेसर आहे. 576 वर्षांपूर्वीचे राम मंदिर बांधणीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. नूतन पदाधिकार्‍यांनी लोकांच्या आरोग्य, वीज, शेती प्रश्‍न सोडविण्याबरोबर केंद्र व राज्य शासनाने लोकहिताच्या आखलेल्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचवुन त्यांना उद्योग व्यवसायातून आर्थिक सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे.
प्रिया पवार म्हणाल्या, निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपण मोठ्या ताकदीचे पदाधिकारी आहात नूतन पदाधिकार्‍यांनी जोमाने कामाला लागावे. विकसित भारताचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हा. युवकांचे मोठे संघटन करा. निशिकांत पाटील यांचे हात मजबूत करा. येणार्‍या निवडणुकीत इस्लामपूर मतदार संघासह जिल्ह्यात परिवर्तन घडवाचे आहे.
राजाराम गरुड म्हणाले, जिल्ह्यातील दोन लोकसभा व आठ विधानसभा मतदार संघात आपण कमळ फुलवायचे आहे. 10 वर्षात एकही भ्रष्टचाराचा आरोप नसणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.
डॉ. उषा दशवंत म्हणाल्या, 2024 ची निवडणूक ही निवडणूक नसून ते एक युध्द असणार आहे. ते युध्द भ्रष्टाचार विरोधात असणार आहे. 10 वर्षांपूर्वी झालेले भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. पारदर्शकता ही पक्षाचे ब्रीद आहे.
अनिल पाटील म्हणाले, नूतन पदाधिकार्‍यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. पक्षाचे काम समाजातील तळागाळापर्यंत पोहचवा.
यावेळी भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील, जिल्हा चिटणीस धैर्यशील मोरे, उपाध्यक्षा आशाताई पवार, चिटणीस जयश्री रणदिवे, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुरेखा जगताप, दिग्विजय नलवडे, मधुकर हुबाले, लक्ष्मण कदम, नरसिंहपूरच्या सरपंच शोभा जगताप, वंदना थोरात आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सरचिटणीस संदीपराज पवार यांनी आभार मानले.

COMMENTS