मातोश्रीवर मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचेच नाव ठरले होते : अमित शहा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मातोश्रीवर मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचेच नाव ठरले होते : अमित शहा

पुणे : गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने विश्वासघात केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडण

मिरचीच्या पिकात गांजा लागवड
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी
‘एकच बायको सात जन्मी नको’ औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन! l पहा LokNews24

पुणे : गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने विश्वासघात केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यातील भाजप मेळाव्यात बोलताना दिले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बूथ प्रमुख आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करतानाच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीचाही चढता आलेख मांडला आणि पुणे महापालिका निवडणुकीतील विजयाने आपण महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला सुरुवात करू या असं आवाहन केलं . राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि खंडणी वसुली हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ ३ चाकी रिक्षाचेच नाही तर या रिक्षाची तीनही चाके पंक्चर झाली आहेत त्यामुळं राज्याच्या विकासाचा गाडा आहे तिथंच रुतला असल्याचं शहा म्हणाले . याउलट केंद्रातील मोदी सरकारने जे सांगितलं ते करून दाखवलं असं सांगतानाच त्यांनी अयोध्येतील मंदिर निर्माण , काश्मिरातील कलम ३७० हटवल्याची उदाहरणे दिली . कोरोना काळात देशाने आरोग्य व्यवस्थेत जी झेप घेतली आणि लसीकरणातही जे उद्दिष्ट गाठलं त्याच कौतुक साऱ्या जगाने केल्याचं शहा म्हणाले . स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगणाऱ्या टिळकांची ही पुण्यभूमी असून इथली महापालिका आपण स्वबळावर जिंकून तर आणूच पण सत्ता हाच आमचा जन्मसिद्ध हक्क असल्याचं सांगणाऱ्या शिवसेनेलाही त्यातून धडा शिकवू असं शहा म्हणाले . पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , खासदार गिरीश बापट यांचीही या मेळाव्यात भाषण झाली .

COMMENTS