ज्ञानवापी मशीद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानवापी मशीद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

वाराणसी/वृत्तसंस्था : वारासणीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवार आणि सोमवारी असे दोन दिवसात शांततेत पूर्ण झाले. विशेष म्हणजे या

मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला सुरुवात
नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन गळा चिरुन हत्या
साक्षी, विनेश आणि बजरंग नोकरीवर परतले

वाराणसी/वृत्तसंस्था : वारासणीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवार आणि सोमवारी असे दोन दिवसात शांततेत पूर्ण झाले. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदूंची बाजू मांडणार्‍या वकिलांनी केलाय. हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी हा दावा केला. या दाव्यानंतर कोर्टाने ज्या जागेवर शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या जागेला तातडीने सील करण्याचा आदेश दिला आहे. त्या जागेवर कोणत्याही व्यक्तीला जाऊ देऊ नये, असा आदेश कोर्टाने दिला असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफला दिली आहे.
या शिवलिंगाच्या संरक्षण आणि जतन केले जावे या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचेही जैन म्हणाले. गेल्या आठवडयात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता, मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे. रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती. मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर बोलतांना हिंदू पक्षातले सोहनलाल म्हणाले की, ’मशिदीत बाबा सापडले आहेत. तेच बाबा ज्याची नंदी वाट पाहत होता. मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्यानंतर हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सर्वांनी आनंद साजरा केला. आता पश्‍चिमेकडच्या दरवाजाजवळ असलेल्या अवशेषांची तपासणी करण्याचीही आम्ही मागणी करणार आहोत,’ असे सोहनलाल म्हणाले. हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 12 फूट 8 इंच व्यासाचे शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाचे तोंड नंदीकडे असून, वजूस्थळातले सर्व पाणी काढून केलेल्या पाहणीवेळी ते आढळल्याचा त्यांचा दावा त्यांनी केला आहे.

COMMENTS