Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन

अकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतींने अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा विभागामार्फत नागरी सुविधा पुरविण्यासाठी विविध योजनाअंतर्गत काल बुधवारी ठक्कर

Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये गीता जयंती उत्साहात
कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 4.65 कोटीची मान्यता

अकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतींने अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा विभागामार्फत नागरी सुविधा पुरविण्यासाठी विविध योजनाअंतर्गत काल बुधवारी ठक्कर कॉम्प्लेक्स समोर व महात्मा फुलै चौक येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे शहरातील व उपनगरांमधील अवेळी होणारा पाणीपुरवठा नियमित सुरळीत होईल असा विश्‍वास नगरपंचायतीच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व नगरसेवक यांनी व्यक्त केला.
              अकोले नगरपंचायतीचे नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेअंतर्गत रक्कम रु.29 लाख 17 हजाराच्या किंमतीचे अकोले नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्र पासून ते मरा.वि.वि कंपनी मर्या. कार्यालयापर्यंत नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर या योजनेअंतर्गत रक्कम रु.29 लाख 13 हजाराचे पाणीपुरवठा जलशुदधीकरण केंद्र ते महात्मा फुलै चौकापर्यंत नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे, नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत रक्कम रुपये 40 लाख 75 हजार रुपये किमतीचे पाणीपुरवठा जलशुध्दीकरण केंद्र ते शॅम्प्रो ऑफिसपर्यंत नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे तसेच रक्कम रु.44 हजार 65 हजार रुपये किमतीचे पाणीपुरवठा जलशुध्दीकरण केंद्र ते रिलायन्स पेट्रोल पंप शेकईवाडी पर्यंत नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे अशा एकुण 4 कामांचे रुपये 1.43 कोटी किमंतीच्या कामांचे भूमीपूजन माजी. आमदार वैभवराव पिचड यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाजप गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष भाजप सिताराम भांगरे, अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, पाणीपुरवठा सभापती, हितेश कुभार, आरोग्य समिती सभापती, शरद नवले, महिला कल्याण समिती प्रतिभाताई मनकर, बांधकाम सभापती वैष्णवीताई धुमाळ, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक आरिफ शेख, नगरसेवक विजय पवार, नगरसेवक नवनाथ शेटे, नगरसेवक प्रदिप नाईकवाडी, नगरसेविका जनाबाई मोहिते, तमन्ना शेख, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, रमेश धुमाळ, डॉ. अमित काकड, नादिर शेख, अशोक भळगट, रामनिवास राठी, विकास देशमुख,प्रसन्ना धोंगडे, अमोल वैद्य, बबलुशेठ धुमाळ, रवि शेणकर, परशुराम शेळके, सचिन शेटे, आसिफ शेख, नवनाथ मोहिते, दत्ता ताजणे कार्यालय अधिक्षक .अनिल बोरसे, पाणीपुरवठा अभियंता श्रीकांत बगाड, पाणीपुरवठा विभागाचे .सुर्यभान वडजे, बांधकाम विभागाचे .उत्तम शेणकर, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच शहरातील इतर प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी  मोठ्या संख्यने उपस्थित होते.

COMMENTS