Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’सिमी’ संघटनेवर कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करा

राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे आदेश

पुणे ः बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची 29 जानेवारी 2

खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा
आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा
राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

पुणे ः बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची 29 जानेवारी 2024 रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील 5 वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे.
या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच कार्यवाहीबाबत शपथपत्रे दाखल करून ती राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त आचारसंहिता भंगाच्या 65 तक्रारींपैकी 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सी-व्हीजील पोर्टलवर आणि 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व 21 विधानसभा मतदारसंघात स्थापित स्थिर आणि भरारी पथकांना त्या भागातील तक्रार पाठवली जाते. त्यावर तात्काळ कार्यवाही करून पोर्टलवर नोंद केली जाते. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल प विकसित केले आहे. या मोबाईल पद्वारे नागरिकांना थेट निवडणूक प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल पवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

COMMENTS