Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सुखावलो : रामकृष्ण भिंगारे

शहरटाकळी ःसर्वोत्कृष्ट संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळणे हे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या पुण्यकर्माच फळ आहे. या पुरस्काराने मनोमन सु

संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस
राहाता तालुक्यातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल  
पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा

शहरटाकळी ःसर्वोत्कृष्ट संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळणे हे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या पुण्यकर्माच फळ आहे. या पुरस्काराने मनोमन सुखावलो. 1972 च्या दुष्काळात अतिशय खडतर परिस्थितीत आबासाहेबांसोबत मी काम केलं आहे. गोर गरीबांचे,दीन दलितांची,समाजात मागासलेल्या वर्गातील मुले शिकवीत मोठी व्हावीत हा ध्यास आबासाहेबांच्या मनी होता.त्यासाठी वसतिगृहाची सोय केली व अक्षरशः गावोगावी हिंडून धान्य गोळा केले. ते कार्य आज देखील अ‍ॅड. डॉ. विद्याधरजी काकडे व सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आबासाहेबांच्या या महान कार्याचा मी साक्षीदार आहे.असे प्रतिपादन विद्यालयाचे माजी निवृत्त शिक्षक रामकृष्ण भिंगारे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने एफ डी एल संस्थेला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सर्वोत्कृष्ट संस्थेचा शाहू, फुले,आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला, त्याप्रसंगी आयोजित गौरव सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून भिंगारे बोलत होते. यावेळी उपस्थित  प्राचार्य कांतेश्‍वर ढोले,माजी अपर पोलीस अधीक्षक ज्ञानदेव गवारे, वाय डी  कोल्हे, विमल पाटेकर, बाळकृष्ण ठोंबळ, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र मडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गावामधून फेरीचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विद्यार्थ्यांनी लेझिम व टिपरी नृत्य सादर केली. व संस्थेच्या या यशाबद्दल प्राचार्य ढोले यांनी गावकर्‍यांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी रामचंद्र गिरम, मनोज घोंगडे, ग्रा.पं.सदस्य संदीप राऊत, निवृत्त मेजर रमेश नरवडे,रामकृष्ण गोरे, भाऊसाहेब मडके, राजेंद्र खंडागळे, तुकाराम लोढे, राधाकिसन मुरदारे, मीरा मुरदारे, अविनाश जगदाळे,नितीन जगदाळे, उत्तम निकाळजे, रवींद्र खरड, महादेव तरसे संस्था प्रतिनिधी अनिल मगर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक दिपक बोडखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका भिसे व मोहिनी बडदे यांनी केले. तर पर्यवेक्षिका अंजली चिंतामण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS