Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केले स्वागत

बुलढाणा प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाने समिती नेमुन त्या माध्यमातून नियुक्ती करण्याच

बोफोर्स आणि राफेलचे फुसके बार
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी, संस्कृती, सिद्धी, रिद्धी व संस्कार यांचा गौरव
उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन

बुलढाणा प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाने समिती नेमुन त्या माध्यमातून नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत, विचाराची लढाई विचारायने लढावी,भ्याड हल्ला करण्यात कुठलाही पुरुषार्थ नाही असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसबा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने, यावरून एकच दिसते की जनता लोकशाहीच्या बाबतीत किती सजग आहे, आणि त्यामुळे लोकशाही जपण्यासाठी सामान्य माणूस मतदानाच्या माध्यमातून उत्तर देत असतो. असा टोलाही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी भाजपला लगावला आहे. ते शिवगर्जना अभियानाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.

COMMENTS