Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के पी बक्षी समितीच्या शिफारशीं विरोधात कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन

वाशिम प्रतिनिधी -  राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या  सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निवारण करण्यासाठी के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची न

‘द काश्मीर फाइल्स 2’ येणार भेटीला
वेटलिफ्टिंगमध्ये ’आकाश’ची वजनदार कामगिरी
यवतमाळमध्ये नगरसेवकाची हत्या

वाशिम प्रतिनिधी –  राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या  सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निवारण करण्यासाठी के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली होती. या समितीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीचे निवारण करताना कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र कृषी सेवा संघ पुणे या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड,मालेगाव या सहा ही  तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन आज केले. यावेळी त्यांनी आपल्या मागण्याची निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले तसेच केपी बक्षी समितीच्या विरोधात घोषणाबाजी ही केली. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे त्रिव आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

COMMENTS