विना परवाना रस्ता खोदणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल ; महापालिकेची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विना परवाना रस्ता खोदणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल ; महापालिकेची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी- मनपाने केलेल्या सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना खोदकाम करणार्‍याविरुद्ध महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे खोदकाम करणार्‍

पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ

अहमदनगर/प्रतिनिधी- मनपाने केलेल्या सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना खोदकाम करणार्‍याविरुद्ध महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे खोदकाम करणार्‍याला मनपाने आधी नोटीस देऊन दंड भरण्यास सांगितले होते, पण त्याला त्याने प्रतिसाद दिला नसल्याने अखेर मनपाचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी हॉटेल रेडियन्सचे मालक राहुल रासकोंडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सार्वजनिक रस्त्याची नासधुस करणारांवर खूप दिवसांनी मनपाने अशी आक्रमक कारवाई केली असल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत मनपाचे शाखा अभियंता निंबाळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी अहमदनगर महापालिकेत शाखा अभियंता (बांधकाम विभाग) या विभागात 2008 पासून नेमणुकीस आहे. माझ्या कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक 9 ते 17 या प्रभागातील रस्ते, गटार, इमारत देखभाल दुरुस्ती व विविध स्थापत्यिक कामे केली जातात. दिनांक 21 जून 2021 रोजी ठेकेदार चंद्रशेखर म्हस्के (यश कन्स्ट्रक्शन, अहमदनगर) यांनी मला फोन करून कळविले की, प्रभाग क्र.13 (सध्याचा व प्रभाग क्र. 30 पूर्वीचा) मध्ये नगर-पुणे रस्त्यावरील नव्या पुणे बसस्थानकाजवळील हॉटेल पंचवटीच्यामागील गणेशवाडीकडे जाणार्‍या रोडवर हॉटेल रेडीयंसजवळ असणारा डांबरी रोड खांदलेला आहे, असे कळविले होते. त्यानुसार दिनांक 25 जून 2021 रोजी मी व बांधकाम विभागाचे मुकादम अशोक बिडवे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी रस्ता हा सहा मीटर लांब खोदलेला दिसल्याने तसा सविस्तर पंचनामा केला आहे. तसेच हॉटेल रेडीयंसचे मालक राहुल रासकोंडा (पूर्ण नाव माहीत नाही) यांना या रस्ता खोदाईबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या टेलिफोन केबलची वायर तुटलेली असल्याने केबल दुरुस्ती करता आम्हीच रस्ता खांदला होता, असे कळवल्याने मी त्यांना हा रस्ता खांदण्याबाबत परवानगी घेतली होती का, याबबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही असे सांगितल्याने त्याबाबत मनपा आयुक्तांकडेकडे या विनापरवाना रस्ता खोदकामाबाबत व दंड आकारणीबाबत दिनांक 25 जूनला अहवाल सादर केला आहे, असे या तक्रारीत त्यांनी म्हटले
आहे.

नोटिशीला प्रतिसाद नाही
या तक्रारीत निंबाळकर यांनी पुढे म्हटले आहे की, 30 जून आयुक्तांनी या अहवालाला मान्यता दिली व त्यानुसार दिनांक 2 जुलैला हॉटेल रेडीयंसचे मालक रासकोंडा यांना विनापरवाना रस्ता खोदकामाबाबत दंड भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती, परंतु त्यांनी आजपर्यंत दंड भरला नसल्याने मनपा उपायुक्त सचिन राऊत यांनी दिनांक 8 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याबाबत प्राधीकृत केल्याने या पत्राच्या अनुषंगाने व मी संबंधित प्रभागाचा शाखा अभियंता असल्याने माझी हॉटेल रेडीयंसचे मालक राहुल रासकोंडा यांच्याविरुध्द सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. दि. 21जून 2021चे पूर्वी प्रभाग क्र. 13 (सध्याचा व प्रभाग क्र. 30 पूर्वीचा) गणेशवाडीकडे जाणार्‍या रोडवर हॉटेल रेडीयंसजवळ (नगर-पुणे रोड अहमदनगर) या ठिकाणी असणारा डांबरी रोड राहुल रासकोंडा (रा. रेडीयंस हॉटेल, नगर-पुणे रोड, अहमदनगर) याने महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता रस्ता खांदुन या सार्वजनिक मालमत्तेचे एकूण 12 हजार रुपयांचे नुकसान करुन तसेच या नुकसानीबाबत त्यांना दंड आकारुन त्यामध्ये महापालिकेच्या नियमाप्रमाणे शास्ती व इतर दंड आकारुन या दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावली असता त्यांनी आज पावेतो ही दंडाची रक्कम भरली नाही म्हणून माझी त्यांच्या विरुध्द सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS