साखर उत्पादन आगामी हंगामातही विक्रमी होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखर उत्पादन आगामी हंगामातही विक्रमी होणार

साखर आयुक्तालयाचा अंदाज; 138 लाख टन उत्पादन शक्य

पुणे : राज्यात गळीत हंगाम संपला असून, यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन घेण्यात आले. साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे भारताने ब्राझील देशाला मागे टाकत अव्वल

फलटण तालुक्यात वाघाटी मांजराचा वावर; मादीसह तीन पिल्लांचे दर्शन
सातारा-सांगली वन विभागाची नाशिकमध्ये कारवाई; एकाला अटक
खडकदेवळा येथे वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे नुकसान

पुणे : राज्यात गळीत हंगाम संपला असून, यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन घेण्यात आले. साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे भारताने ब्राझील देशाला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. आगामी गळीत हंगामही विक्रमी ठरणार आहे. साखर आयुक्तालयाने वर्तविलेल्या अंदाजानुसार इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात येणारी सुमारे 12 लाख टन साखर वगळून आगामी हंगामात 138 लाख टन साखर उत्पादन होणार आहे. राज्यातील उसाचे क्षेत्र 14 लाख 87 हजार 836 हेक्टरवर गेल्याचेही अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
आगामी गळीत हंगामाविषयी साखर आयुक्तालयाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, गळितासाठी 14 लाख 87 हजार 836 हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात ऊसतोड झालेल्या क्षेत्रापेक्षा सध्याचे ऊसक्षेत्र सरासरी हजार हेक्टरने अधिक असणार आहे. सरासरी हेक्टरी 95 टन प्रमाणे उत्पादन गृहीत धरले असता हंगामासाठी एकूण 1413 लाख टन ऊस उपलब्ध असणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी 100 लाख टन अधिक ऊस उपलब्ध होणार आहे. या एकूण उसापैकी 95 टक्के ऊस गाळपासाठी येईल, असे गृहीत धरल्यास 1343 लाख टन ऊस प्रत्यक्षात साखर कारखान्यांत गाळपासाठी येईल. सरासरी 11.20 टक्के साखर उतारा गृहीत धरल्यास 150 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मितीसाठी 12 लाख टन साखरेचा संभाव्य उपयोग गृहीत धरल्यास प्रत्यक्षात राज्यात 138 लाख टन साखर उत्पादन होईल. हे साखर उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत एक लाख टनांनी अधिक असेल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे. यंदा मराठवाडयात ऊसतोडणी करताना कारखान्यांच्या नाकीनऊ आले होते. पश्‍चिम महाराष्ट्रात सरासरी 150 दिवस आणि जालन्यात 200 दिवस हंगाम चालला होता. यंदाही मराठवाडयात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. धरणे भरली आहेत. त्यामुळे उसाला पाणी कमी पडणार नाही. उसाचे एकरी उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही मराठवाडयातील ऊस वेळेत तोडणी होण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी आणि कारखान्यांची होणारी संभाव्य दमछाक टाळण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यात मागील हंगामात तोडणी झालेले क्षेत्र 49 हजार 581 हेक्टर होते. यंदा त्यात मोठी भर होणार असून, 84 हजार 208 हेक्टर क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. जालन्यात मागील हंगामात 34 हजार 434 हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यंदा 47 हजार 227 हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात सांगली जिल्ह्यात 92 हजार 715 हेक्टरवरील उसतोडणी झाली होती. आता 13 लाख 7 हजार 585 हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे.

यंदाचा हंगाम गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या कारखान्यांना शक्य आहे त्यांची गाळप क्षमता वाढविण्यावर भर आहे. ऊसतोडणी यंत्रे खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऊसक्षेत्राची ठोस माहिती मिळविण्यासाठी ई-पीक पाहणीतील आकडेवारीची मदत घेतली जाणार आहे.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त

COMMENTS