Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा-सांगली वन विभागाची नाशिकमध्ये कारवाई; एकाला अटक

कराड / प्रतिनिधी : सहा महिन्यापूर्वी कराड, सांगलीसह कोल्हापूरच्या विविध पूजेचे साहित्य विकणार्‍या दुकानावर छापे टाकून वन विभागाने श्‍वापदांच्या अवयवा

‘काढा तण – वाचवा वन’ या ऐतिहासिक अभियानास” अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात
टोमॅटोने शेतकऱ्याला केले श्रीमंत
टायर फुटल्याने कराड शहरात ऊसाचा ट्रक पलटी

कराड / प्रतिनिधी : सहा महिन्यापूर्वी कराड, सांगलीसह कोल्हापूरच्या विविध पूजेचे साहित्य विकणार्‍या दुकानावर छापे टाकून वन विभागाने श्‍वापदांच्या अवयवापासून तयार होणार्‍या सहित्यांची विक्री रोखली होती. त्या गुन्ह्याचा तपास करताना हाती आलेल्या माहितीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील वन विभागाच्या स्थापन झालेल्या विशेष शोध पथकाने नाशकात कारवाई केली. दुर्मिळ श्‍वापदांचे अवयव व त्यापासून तयार केलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. नाशिक येथे लक्ष्मी पूजा साहित्य भांडारावर छापा टाकला. दुकानचालक बबन कुलथे (रा. नाशिक) यास याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 मध्ये कराडसहीत सांगली, कोल्हापूर येथे विविध पूजा साहित्य भांडारवर वेळी छापे टाकत कारवाई केली होती. त्यात इंद्रजाल म्हणजेच ब्लॅक कोरल, रेडसी फॅन, हत्ताची जोडी म्हणजेच घोरपडीचे गुप्तांग असे प्रतिबंधीत असलेल्या श्‍वापदाच्या अवयवापासून तयार केलेले साहित्य जप्त केले होते. त्याच प्रकरणाचा तपास सुरू होता. त्याची व्याप्ती वाढल्याने छापे व अन्य कारवाईसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव विभागांचे संयुक्त शोध पथक स्थापन केले. त्या संयुक्त पथकाच्या तपासात नाशिकलाही त्याची मोठी विक्री सुरू अशल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक येथील लक्ष्मी पूजा भांडारावर वनविभागाने आज दुपारी छापा टाकला. छाप्यात इंद्राजाल म्हणजेच ब्लॅक कोरल, हत्ता जोडी म्हणजेच घोरपडीचे गुप्तांग साळींदराचे काटे, रानडुक्कराचे दात, रक्तचंदनाच्या छोट्या बाहुल्या, अन्य वन्यजीव अवयव असा विक्रीसाठी केलेला साठा वन विभागाने जप्त केला आहे. त्यात दुकान चालक कैलास बबन कुलथे यास अटक केली आहे.

COMMENTS