Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी

राजूर/प्रतिनिधी ः भंडारदरा येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वनकमिटी सदस्य व संरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक

विवेक कोल्हे यांची को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड
पाण्यातून शाळेत जाण्याची जीवघेणी, चिमकुल्याची वाट
खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

राजूर/प्रतिनिधी ः भंडारदरा येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वनकमिटी सदस्य व संरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक संपन्न झाली असून काजव्यांच्या कालचक्राला कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वेगवेगळ्या सुचना कळसुबाई हरिश्‍चंद्रगड वन्यजीव विभागाच्या वतीने देण्यात आल्या.
राज्यभरातील पर्यटकांच्या पसंतीचा असणारा भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाला यावर्षी मोठी गर्दी होईल असा अंदाज गृहीत धरून स्थानिक प्रशासनाने या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे कोविड काळात दोन वर्षापासून या काजवा महोत्सवा वर निर्बंध आले होते यामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर होणारा हा पहिलाच काजवा महोत्सव आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात तसेच रिंगरोडवरील काजवा महोत्सव जगविख्यात आहे. या काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले मे महिन्याच्या अखेरीस आपोआपच भंडारदर्‍याच्या दिशेने वळतात. गत दोन वर्षांपासुन कोरोना या विषाणुजन्य रोगामुळे भंडारदर्‍याचा काजवा महोत्सवाही थांबला गेला होता. पंरतु आता कोरोना सदृष्य स्थिती दूर झाल्या ने भंडारदर्‍याच्या वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात 15 मे ते 15 जून या कालावधीत काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काजव्यांचे दिवसेंदिवस प्रमाण घटत चालल्याचे दिसुन येत असुन काजव्यांच्या कालचक्रात कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वनविभागाकडून काही ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यासाठी काजवा महोत्सवात भंडारदरा परीसरात येणार्‍या पर्यटकांना एका विशिष्ट ठिकाणी आपली वाहने पार्क करुन नंतरच काजव्यांचा आनंद घेता येणार आहे. मद्य, साऊंड सिस्टीम, व प्लास्टिक पर्यटकांना अभयारण्यात घेऊन जाता येणार नाही. अभयारण्यात वरिलपैकी कोणतीही वस्तु आढळुन आल्यास किमान 5 हजार रु. दंड आकारण्यात येणार आहे. कोणतेही वाहन रस्त्यात पार्क करण्यात येणार नाही. रस्त्यात वाहन पार्क केलेले आढळुन आल्यास 1 हजार रु दंड वन्यजीव विभागाकडुन आकारण्यात येईल. तसेच काजवा महोत्सवात वनविभागाच्या अभयारण्यात रात्री 9 :30 नंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. अभयारण्यातून रात्री 10 : 30 पर्यंत बाहेर पडणे बंधनकारक असेल. अभयारण्यात डीजे व इतर वाद्य वाजवताना आढळुन आल्यास वनविभाग व पोलिस विभाग मिळुन कारवाई करतील अशी माहिती वन्यजीव विभागाचे प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली. काजवा महोत्सवाताच्या कालावधीत काजव्यांच्या लिलयेचा आनंद घेताना आदिवासी लोकसंस्कृतीच्या लोककलेचा आनंद घेता यावा यासाठी लव्हाळवाडी येथे लोककलेचे प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती या बैठकीत देण्यात आली अकोले तालुक्यातील भंडारद-याच्या काजवा महोत्सवाला बळकटी यावी हा उद्देश समोर ठेऊन शेंडी (भंडारदरा) येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वनकमेटी सदस्य व संरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक संपन्न झाली काजव्यांच्या कालचक्राला कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वेगवेगळ्या सुचना कळसुबाई हरिश्‍चंद्रगड वन्यजीव विभागाच्या वतीने देण्यात आल्या. या बैठकीसाठी वन्यजीव विभागाच्या हद्दीतील समावेश असलेल्या गावांचे सरपंच , वनकमेटी सदस्य, नासिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, दत्ता पडवळे हे उपस्थित होते.

कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवात पर्यटकांनी काजव्यांचा निखळ आनंद घ्यावा. काजवा महोत्सवास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. काजवा महोत्सवात मद्यपान करुन धांगडधिंगा करणार्‍या पर्यटकांना कारवाईस सामोरे जावे लागेल.
गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, राजुर

COMMENTS