Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो, भीती न बाळगता आव्हान स्वीकारा तरच यशस्वी व्हाल- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

बीड प्रतिनिधी - स्वतः मध्ये विश्वास निर्माण करून ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने आजच वाटचाल सुरु करा. सर्वप्रथम स्वतःला परिपकव करा, कुठल्याही आ

एमआयडीसी येथील कंपनीत तरुणीचा विनयभंग करुन मारहाण
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांची शिक्षकांसाठी ‘टीआर’ या उपाधी ची घोषणा
नेते तीन; संदेश एक !

बीड प्रतिनिधी – स्वतः मध्ये विश्वास निर्माण करून ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने आजच वाटचाल सुरु करा. सर्वप्रथम स्वतःला परिपकव करा, कुठल्याही आव्हानची मनात भीती बाळगू नका, ध्येय निश्चित करून आपले मार्गक्रमण सुरु करा तरच आयुष्यात यशस्वी व्हाल असे वक्तव्य बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ट्विनकलिंग स्टार शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमात केले.
    दि.19 जुलै रोजी बीड शहरातील नामांकित ट्विनकलिंग स्टार स्कूल येथे इन्व्हेस्टर सरेमनी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. याचबरोबर बीड शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, संस्थाचालक श्री व सौ मैड दांपत्य उपस्थित होते. मान्यवरांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत तथा नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा स्वागतसत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची सवय लागावी व त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी ट्विनकलिंग शाळेने विद्यार्थ्यांची विविध गट (हाऊस) तयार करून त्यांच्यातीलच काही मुलांना त्या हाऊसचा लीडर केले आहे. या सर्व लीडरचा मान्यवारांनी मानसन्मान करून त्यांना लीडरशिप तथा नेतृत्व कसं असावं याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. यासर्व टीम लीडर्सचा मान्यवर, शिक्षक तथा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, बीड शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, संस्थाचालक श्री व सौ मैड दांपत्य यांच्यासह शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर श्री भास्करन, प्राचार्य दीपककुमार झा, सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तथा पालकांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ट्विनकलिंग शाळेच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक विकासावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी योगा, प्राणायाम तथा व्यायामाची सवय लावणे गरजेचे आहे. या वयापासूनच विद्यार्थ्यांनी पुस्तकांची आवडत निर्माण करायला हवी. कारण पुस्तकांमधून तुमच्या ज्ञानात अधिक भर पडायला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःला एका चौकटीत बांधू नए. मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार एवढंच मनात स्वप्न न बाळगता पुढील क्षेत्रांचा देखील विचार करावा  कारण आज प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत. गरज आहे फक्त स्वतःला त्या दृष्टिकोनातून परिपक्व करण्याची. यशस्वी होयचा निर्धार मनात ठाम असेल तर आत्मविश्वास बाळगा, कारणे देणे बंद करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. यश तुमच्या पदरात नक्की पडेल असे मत व्यक्त करत तर स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभव सांगत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचा ट्विनकलिंग शाळेच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

COMMENTS