Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना रस्ते ग्रामस्थांसाठी केले की राजकीय गुत्तेदार पोसण्यासाठी ? :- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई मुंढे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2015 ते 2021-22 पर्यंत एक

बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
भयंकर, एका व्यक्तीला या कारणामुळे दिले पेटवून | LokNews24
भारतीय संघाला पाकिस्तान संघाबरोबर झालेला पराभव विसरावा लागेल.

बीड प्रतिनिधी – तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई मुंढे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2015 ते 2021-22 पर्यंत एकुण 1933 किलोमीटर लांबीचे व अंदाजे किंमत 1986 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता असलेले रस्ते आणले मात्र बीड जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाचे रस्ते पाहता पंकजाताई मुंढे यांनी रस्ते ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणले होते की गुत्तेदार पोसण्यासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पंकजाताई मुंढे यांचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी संगनमताने शासनाची आर्थिक लुट केली असुन संबंधित प्रकरणात कंत्राटदार व ठेकेदार यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री यांना केली आहे.
बीड तालुक्यातील पालवण ते लिंबागणेश प्राजिमा 31जवळ ते आहेर धानोरा, वरवटी,भाळवणी बेलेश्वर ते लिंबागणेश एकुण 24 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची किंमत 12 कोटी 75 लाख रुपये असुन या रस्त्याचे काम एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन बीड यांच्या मार्फत करण्यात आले असून अत्यंत निकृष्ट कामामुळे रस्ता जागोजागी उखडला असुन ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या पालवण ते लिंबागणेश अंदाजे 13 कोटी रुपये किंमतीच्या रस्ता कामाचे लोकार्पण माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते दि.19 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते.मात्र वर्षभरात या रस्तेकामाचे पितळ उघडं पडले आहे. पिंपरी शिवारात वनविभागाच्या शेजारीच मस्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे खडीक्रशर असुन या रस्त्यावरुन खडीच्या हायवांची वाहतूक असल्याने या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.संबधित प्रकरणाची तक्रार केल्यानंतर थातूरमातूर डागडुजी करण्यात येते मात्र महिनाभरातच पुन्हा पुर्वीप्रमाणे खराब रस्ता आढळून येतो. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के  पत्नी सौ.जयश्री मस्के लिंबागणेश जिल्हा परीषद सर्कलचे प्रतिनिधित्व करत असुन पंकजाताई मुंढे यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी निदान त्यांच्या जिल्हा परिषद सर्कल मधील रस्ते तरी दर्जेदार करावेत अशी सर्कल मधील ग्रामस्थांनी व्यथा बोलावुन दाखवली.

COMMENTS