Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नदीपच्या अध्यक्षांविरोधात विद्यार्थी, पक्ष संघटनांचा मोर्चा

शिवप्रतिष्ठानचे बेमुदत उपोषण सुरू कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ

जामखेड ः रत्नदीप मेडिकल फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याविरोधात तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू आहे. गुरूवारी सकाळी सकाळी खर्डा चौक ते तहसी

रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ
Ahmednagar : दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला धक्काबुक्की | LOKNews24
दैनिक लोकमंथन l बोठेनं मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला पाच लाखांचा लाभ

जामखेड ः रत्नदीप मेडिकल फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याविरोधात तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू आहे. गुरूवारी सकाळी सकाळी खर्डा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत डॉ भास्कर मोरेंच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, संघटना व काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. भास्कर मोरे तुझे काळे धंदे बंद कर, भास्कर मोरेंना अटक झाली पाहिजे, रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जामखेडची बदनामी थांबलीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत म्हणाले की, आण्णासाहेब सावंत रत्नदीप मेडिकलने अनेक वर्षांपासून जो काळा बाजार मांडला आहे त्याविरोधात सर्वांनी मिळुन आवाज उठवला पाहिजे, पोलीस प्रशासनाने मुलींचे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळले पाहिजे, यावर एक कमिटी नेमावी व लवकरात लवकर हे प्रकरण हाताळावे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे म्हणाले की जामखेड तालुक्याला चांगला इतिहास तालुक्यात अशा संस्थाचालकाकडुन दुर्दैवी घटना घडत आहेत. तीन दिवस झाले तरी यावर प्रशासनाकडून तोडगा निघाला नाही हे दुर्दैवी आहे. मनसे नेते हवा सरनोबत म्हणाले की, भास्कर मोरे यांनी तुमच्यावर दबाव आणला तर अर्ध्या रात्री आम्हाला मदत मागा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या खंबीर पाठीशी आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनीवर अन्याय होत आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सुव्यवस्था बिघडली आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत.आ.रोहित पवार आ. प्रा. राम शिंदे व पालकमंत्री यांनी देखील याविषयाकडे गांभीर्याने पाहुन हा विषय हाताळला पाहिजे असे सांगितले. यानंतर शेवटी मोर्चा दरम्यान तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे,प्रदिप टापरे, हवा सरनोबत, सनी सदाफुले, आण्णासाहेब सावंत, पवनराजे राळेभात, जयसिंग उगले, महेश निमोणकर, गणेश हगवणे, सचिन देशमुख, अवधुत पवार, नाना खंडागळे, आकाश घागरे, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेञे, गणेश मासाळ, गणेश जोशी, स्वप्निल खाडे विजय राळेभात, बाळासाहेब ढाळे, रोहित चव्हाण,संतोष नवलाखा, अनिल पाटील यांच्या सह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या आरोपांची चौकशी करावी तसेच रत्नदीपच्या अध्यक्षांकडुन अन्यायबाबत गुन्हा दाखल व्हावा यामागणीसाठी विद्यार्थी विद्यार्थींनीसह शिवप्रतिष्ठानच्या वतीने बेमूदत उपोषण चालू केले आहे. उपोषणाला सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात येत आहे.

विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा इशारा – यावेळी मोर्च्याच्यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना एका विद्यार्थ्याने सांगितले की, मुली रत्नदीपच्या अध्यक्षांविरोधात केस द्यायला तयार आहेत, मात्र पोलीस केस घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे यामध्ये काही आर्थिक तडजोड झाली आहे का ?असा सवाल उपस्थित करत आम्हाला न्याय मिळावा अन्यथा मी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करीन असा इशारा देखील विद्यार्थ्याने दिला.

सहायक महिला पोलिस निरीक्षक करणार चौकशी – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची गुरूवारी रात्री प्रशासनाने दखल घेतली असून, उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी प्रातांधिकारी नितीन पाटील आणि पोलिस उपाधीक्षक शशिकांत वाखारे यांनी उपोषणस्थळी भेट देत विद्यार्थ्यांचे म्हणणे एकूण घेतले. तसेस या मुलींचे म्हणणे निर्भयपणे ऐकूण घेण्यासाठी सहायक महिला पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी आज शुक्रवारी पुणे विद्यापीठातील अधिकारी आणि बार्टीचे अधिकारी उपोषणस्थळी भेेट देऊन मुलींच्या आरोपांतील तथ्य जाणून घेणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे. विद्यार्थ्यांनी गुरूवारी रात्रभर उपोषणस्थळी ठाण मांडून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

COMMENTS