रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ

बारामतीत रेमडीसिविरच्या बाटलीत पॅरासिटामॉल औषध भरून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत सलाइनचे पाणी भरून विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत
गैरव्यवहार करा आणि ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ बना !

अहमदनगर/प्रतिनिधी- बारामतीत रेमडीसिविरच्या बाटलीत पॅरासिटामॉल औषध भरून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत सलाइनचे पाणी भरून विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. डॉक्टरांनी कचर्‍याच्या डब्यात फेकलेल्या रेमडीसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सिरींजने सलाइनमधील पाणी भरून त्याची विक्री करणात येत होती. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सध्या कोरोना रुग्णांचे नातेवाइक रेमडीसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा गैरफायदा घेत काहीजण पैसा कमावतात. श्रीरामपुरातील एका रुग्णाला तातडीने रेमडीेसिविरची आवश्यकता होती. त्याच्या नातेवाइकाला रईस अब्दुल शेख (वय 20, रा. मातापूर, ता. श्रीरामपुर) याने संपर्क करून रेमडीेसीविर देतो, असे सांगितले. डॉक्टरांची चिठ्ठी नसताना 25 हजार रुपयांना इंजेक्शन देत असल्याने नातेवाइकाला संशय आला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व रईस शेख याला श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ पकडले. त्याच्याकडून बनावट रेमडीेसीविर इंजेक्शन जप्त केले. या प्रकरणी भगत उर्फ भक्ती भागवत काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शेखकडे अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. डॉक्टरांनी कचर्‍याच्या डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडीसिविर इंजेक्शनमध्ये सलाइनचे पाणी भरून विकायचो, असे त्याने सांगितले. रईस याने असे किती बनावट इंजेक्शन करोना रुग्णांच्या नातेवाइकांना विकले? यामुळे कोणते रुग्ण दगावले का? याचा तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत. फौजदार समाधान सुरवडे व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक दुधाडे, पोलीस शिपाई किरण पवार, वांढेकर, अर्जुन पोकळे यांनी ही कारवाई केली.

COMMENTS