Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियमित व्‍यायाम करत निरोगी राहा डॉ.पंकज राणे

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ज्‍येष्ठ नागरिकांशी साधला संवाद

नाशिक - निरोगी राहायचे असेल तर आहारासोबत विहाराला महत्त्व आहे. विशेषतः वाढत्‍या वयात आजारांना दूर ठेवायचे असेल तर नियमित व्‍यायाम करणे महत्त्वाचे

बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप
भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट

नाशिक – निरोगी राहायचे असेल तर आहारासोबत विहाराला महत्त्व आहे. विशेषतः वाढत्‍या वयात आजारांना दूर ठेवायचे असेल तर नियमित व्‍यायाम करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन नारायणी हॉस्‍पिटलचे प्रसिद्ध मधुमेह व हृदयविकार तज्‍ज्ञ डॉ.पंकज राणे यांनी केले. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आयोजित ज्‍येष्ठ नागरिकांशी संवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परीसरातील ज्‍येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. ‘निरोगी राहाण्यासाठी व्‍यायामाचे महत्त्व’ असा व्‍याख्यानाचा विषय होता.

डॉ.राणे म्‍हणाले, व्‍यायामात सातत्‍य राखणे महत्त्वाचे असते. आठवड्यात किमान १५० मिनिटे किंवा दैनंदिन ३० मिनिटे असे आठवड्यात किमान पाच दिवस व्‍यायाम झाला पाहिजे. आपण नियमित स्‍वरुपात करु शकू असे चालण्याचा किंवा योगासन व इतर व्‍यायाम करता येऊ शकतात. आपला मित्र परिवार, कुटुंबातील सदस्‍य किंवा आपल्‍या ग्रुपने व्‍यायाम केल्‍यास सातत्‍य राखण्यास मदत होते. नियमित व्‍यायामाचे चांगले परीणाम जीवनात जाणवतात. यामध्ये आपल्‍यातील ऊर्जेचा स्‍तर चांगला राहाण्यासह सकारात्‍मक विचारांसाठी मदत होते. हाडे, मांसपेशी व सांधे यांच्‍यातील व्‍याधी टाळण्यास मदत होते. आपल्‍या क्षमता वाढीस व्‍यायामाने फायदा होतो. हृदयविकार, रक्‍तदाब या आजारांतील तीव्रता कमी होण्यासदेखील मदत होते.  मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना इन्‍शुलीनची प्रक्रिया सुरळीत करतांना, औषधांची मात्रा घडविण्यात नियमित व्‍यायाम प्रभावी ठरते. ज्‍येष्ठ नागरिकांमध्ये वाढत्‍या वयात तोल जाण्याचे प्रकार घडतात. यामध्ये त्‍यांना गंभिर दुखापत होण्याची भिती असते. ही बाब टाळायची असेल, तर ‘बॅलंसिंग एक्‍सरसाईज’ अर्थात तोल सांभाळण्यास मदत होईल असे व्‍यायामाचे प्रकार नियमितपणे केले पाहिजे. यामुळे संभाव्‍य इजा टाळण्यास मदत होऊ शकते. कंटाळा न करता नियमितपणे व्‍यायाम करतांना सुदृढ आरोग्‍य राखण्यासाठी त्‍यांनी उपस्‍थित ज्‍येष्ठ नागरिकांना शुभेच्‍छा दिल्‍या. उत्‍कृष्ट मार्गदर्शन केल्‍याबद्दल डॉ.राणे यांचा यावेळी सत्‍कार करण्यात आला.

COMMENTS