Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास सन 2021-22 साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्त

नेव्ही भरती नियुक्तीचे पत्र निघाले बनावट…एकास अटक
आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?
शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे

कोपरगाव प्रतिनिधी ः स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास सन 2021-22 साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सवोच्च पुरस्कार ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आलेली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.
अक्षय आव्हाड यांच्या या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अक्षय आव्हाड यांनी या अगोदर विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. सन 2019 या वर्षी श्रीलंका येथे झालेल्या बेसबॉल स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने कास्यंपदक पटकावले होते व आव्हाड यास बेस्ट पीचर म्हणून पारितोषिक देण्यात आले होते. हा पुरस्कार प्राप्त होणारा तो कोपरगाव तालुक्यातील प्रथम खेळाडू ठरला आहे. ग्रामीण भागात सर्वात प्रथम के. जे. सोमैया महाविद्यालयाने हा खेळ महाविद्यालयीन खेळाडूंनकरीता सुरू केला होता. महाविद्यालयाचे अनेक खेळाडू बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे त्यांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून ते विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत. संस्थेने वेळोवेळी महाविद्यालयातील खेळाडूंसाठी अनेक महागडे खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिलेले आहे. नुकतेच महाविद्यालयाने थ्रोविंग मशीन बेसबॉलच्या खेळाडूंसाठी खरेदी केलेले आहे. अशाप्रकारे महाविद्यालय नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. अशी माहिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त श्री. संदीप रोहमारे यांनी येथे दिली. श्री. आव्हाड याला महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. सुनील कुटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अक्षय आव्हाड याने मिळविलेल्या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अड. एस. डी. कुलकर्णी, विश्‍वस्त संदीप रोहमारे,  कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्याचे अभिनंदन केले असुन,तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे.

COMMENTS