शनिशिंगणापरात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिशिंगणापरात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी

सोनई- ( प्रतिनिधी)  करोना महामारी मुळे शनि मंदीर गेल्या दोन वर्षा पासून बंद होतें पहाटेच्या आरती नंतर शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुल

कांद्याच्या निर्यात शुल्कात 40 टक्के वाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने केला निषेध
*LokNews24! देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर
राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी ; ३९९.३३ कोटींचा निधी मंजूर : आ. रोहित पवार

सोनई- ( प्रतिनिधी) 

करोना महामारी मुळे शनि मंदीर गेल्या दोन वर्षा पासून बंद होतें पहाटेच्या आरती नंतर शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले झाले दोन वर्षा पासून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता मात्र आज मंदीर खुले झाल्याने शिंगणापूर पुन्हा गजबजले 

छोटे मोठे व्यवसाईकाचे धंदे सुरू झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे मंदीर बंद असल्याने सर्व काही ठप्प झाले होते भाविकांना करोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने चौधरया खालून दर्शन घेण्याची शासनाने परवानगी दिली असल्याने भाविकांची गर्दी न करता करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व तोंडाला मास्क असणे आवश्यक आहे 

देवस्थान सुरू झाले असले तरी करोना काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा प्रशासनास वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नये असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या बंद काळात सर्वत्र शुकशुकाट होता येथील छोटे मोठे व्यवसाय सुरू झाल्याने परिसर गजबजून गेला आहे 

राहुरी ते शनिशिंगणापूर रस्ता अद्यापही पुर्ण झाला नसल्याने भाविकांना मधुन प्रचंड नाराजी दिसून येते या रस्त्यांचा कडेला रसवंती चालक त्याच प्रमाणे छोटे मोठे हाँटेल चालक यांचा धंदा दोन वर्षा पासून बंद असल्याने या रसतयाचे काम होणे गरजेचे होते मात्र चार वर्ष झाले तरी हा रस्ता पुर्ण होऊ शकला नाही मंदीर खुले झाल्याने भाविकां बरोबर परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

COMMENTS