खर्डामध्ये होणार महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डामध्ये होणार महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन

जामखेड प्रतिनिधी गेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खर्डा येथील शिवपट्टन किल्ल्यावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करून समतेचा, एकतेचा आणि

संविधानाने दिलेले हक्क समाजापर्यंत पोहचवण्याची गरज – न्यायाधीश नागोरी
नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समिती कार्यालय अहमदनगर येथे व्हावे -अमित आगलावे

जामखेड प्रतिनिधी गेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खर्डा येथील शिवपट्टन किल्ल्यावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करून समतेचा, एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला होता. यंदाच्या वर्षीही आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून खर्डा येथील शिवपट्टन किल्यासमोर डौलाने फडकत असलेल्या देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन 3 ऑक्टों 2022 रोजी आयोजित केले आहे.
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला भेडसावत असलेल्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्र्य या दहा महत्त्वाच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी ही दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे. दसर्‍याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी त्यांचे दहन करण्याची परंपरा आहे. आपल्या या संस्कृती आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतिचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमासाठी खर्डा येथे युवराज संभाजीराजे छत्रपती तसेच लोकप्रिय पौराणिक रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खर्डा येथे होणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS