Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी

अज्ञात चोरट्याचा प्रतापाने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी झाल्या

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा
दैनिक लोकमंथन l महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी टाळेबंदी

संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी,दि.21 ऑगस्ट रोजी दुपारी समोर आला. यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील उघड झाला आहे.
कोरोना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावा. यासाठी कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने विशेष प्रयत्नातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युनिट उभे केले होते. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेले सर्व साहित्य शासनाकडून कोरोना काळात मिळाले आहे. रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याने पालवे यांची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयात परिसेविका म्हणून केली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरच्या भिंतीवरून अज्ञात व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करत सेंट्रलाइज असलेली ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून तांब्याच्या पाईपची चोरी केली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील कर्मचारी राहुल शिरसाठ या सेंटरमध्ये गेले असता,त्यांना तेथील इलेक्ट्रिक पट्टी निघालेली आढळून आल्याने त्यांनी याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना त्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. या संदर्भात शकुंतला पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात 12,61,029/-रुपये किमतीचे तांब्याचे पाईप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी संगमनेरचे पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाकडून या प्लांटच्या बाबतीत कुठलीही सुरक्षा केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यामुळे चव्हाट्यावर आला.

COMMENTS