Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासरत्न पुरस्काराने श्वेता घाडगे यांचा सन्मान

बीड प्रतिनिधी - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एआयएम ट्रस्टच्यावतीने केज येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र येथे जिल्हास्तरीय ऊसतोड कामगार मह

मच्छीमारांना कोळीवाड्याकडून आर्थिक साह्य
संगमनेरमध्ये डोक्याला पिस्तुल लावत 4 लाख 60 हजारांची चोरी
 एक करोड सेल्फी विथ लाभार्थी योजनेचा शुभारंभ प्रथम महाराष्ट्रातुन – भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ

बीड प्रतिनिधी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एआयएम ट्रस्टच्यावतीने केज येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र येथे जिल्हास्तरीय ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांच्याहस्ते पत्रकार श्वेता घाडगे यांना विकासरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी बालहक्क आयोगाच्या सदस्या अ‍ॅड.प्रज्ञा खोसरे, कडूभाऊ काळे, गौरी भोपटकर, शाहीर शितल साठे, इन्फंट इंडियाचे दत्ताभाऊ बारगजे, नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष मनिषा घुले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश पुरी आदींची उपस्थिती होती.


एआयएम ट्रस्ट जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिला त्याचबरोबर महिलांची क्षमता वाढवण्यासाठी अग्रगण्य ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 10 एप्रिल 2023 रोजी नवचेताना सर्वांगीण विकास केंद्र केज येथे सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय ऊसतोड कामगार महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटक अवंतीक जैन, अनिता पाटील यांच्या शुभहस्ते झाले. पत्रकारीता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्वेता घाडगे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याने ट्रस्टच्यावतीने त्यांचा महिला विकासरत्न हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ट्रस्टचे संयोजक आयोजक आणि जिल्हाभरातून आलेल्या ऊसतोड कामगार महिला तसेच महिला क्षमतावृद्धी प्रशिक्षणला उपस्थित असलेल्या शेकडो महिलांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS