Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मिसबाह शेख यांचा सन्मान

ग्रंथालयाला दिले पंचवीस हजारांची पुस्तक

जामखेड प्रतिनिधी ः डॉ. मिसबाह फारूख शेख या जामखेड मधील प्रथम एम.एस.नेत्ररोग तज्ज्ञ महिला डॉक्टर असून त्यांची एमबीबीएस. एम. एस्. पूर्ण करून फॅलोशि

तिघांवर गुन्हा दाखल, एक सावकार जेरबंद; कर्जत पोलिसांची सावकारांविरुद्धची मोहीम सुरूच
नगरच्या शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?
मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका

जामखेड प्रतिनिधी ः डॉ. मिसबाह फारूख शेख या जामखेड मधील प्रथम एम.एस.नेत्ररोग तज्ज्ञ महिला डॉक्टर असून त्यांची एमबीबीएस. एम. एस्. पूर्ण करून फॅलोशिप इन ग्लायकोमा (काचबिंदूतज्ज्ञ)साठी भारतातील नामांकित अशा अरविंद आय हॉस्पिटल (कोईम्बतूर) येथे निवड झाली आहे. नुकताच डॉ. मिसबाह यांनी लिहलेला प्रबंध लेख इंटरनॅशनल बुक ऑफ ऑफ्थॅलमोलॉजीमध्ये छापला गेला आहे. या कौतुकास्पद कामगिरीने जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. डॉ मिसबाह शेख या जामखेड तालुक्याचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.फारुख आझम यांची कन्या असुन डॉक्टर असोसिएशनचे जामखेड तालूकाचे सचिव डॉ सादेक पठाण यांच्या भाजी आहेत. लना होशिंग विद्यालयाच्या डॉ अब्दूल कलाम सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीकांत होशिंग तर प्रमुख पाहुणे डॉ. सादेख पठाण होते. तसेच पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, किशोर कुलकर्णी सर, मुकूंद राऊत, नरेंद्र ढाळे आदी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मिसबाह शेख या लना होशिंग विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यीनी आहेत. आपले उत्तरदायित्व म्हणून डॉ. मिसबाह यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम ग्रंथालयाला पुस्तकासाठी रोख स्वरूपात रुपये 25000 दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी तर आभार बाळासाहेब पारखे सर यांनी मानले.

COMMENTS