Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे दोन ते तीन मंत्री देणार राजीनामा ?

कॅबिनेट विस्तारात ‘या’ मंत्र्यांना मिळणार डच्चू

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू असून, भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले आहे. यात राष्

विकी कौशल विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल | LOKNews24
पुणतांबा-वाकडी रस्त्यासाठी 9.63 कोटीची मान्यता
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू असून, भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहेत. यात आता भाजपचे आणि शिंदे गटाचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या महायुतीत येण्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या नेत्यांमध्येही नाराजीचे सूर दिसून येत आहेत.

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच मंत्रीपदासाठी शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचेही समोर आले आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पुढच्या अनेक अकार्यक्षम आणि वादग्रस्त वाचाळवीर मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यात भाजप तसेच शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांचे नाव असल्याची माहिती आहे. त्यात मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे गटात अनेक आमदार मंत्री होण्यास इच्छुक आहेत, परंतु कॅबिनेट विस्तारात शिंदे गटाला दोन ते तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली. तर आता अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे मंत्रिपदात आणखी वाटेकरी निर्माण झाले आहेत. दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपचे 4 ते 5 मंत्री राजीनामा देणार असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मंत्रीमंडळासाठी भाजपचे 4 ते 5 मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त भाजपने फेटाळ्याची माहिती आहे. भाजपाचे 4 ते 5 मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली होती. जे मंत्री आहेत. ते मंत्रीच राहणार आहेत. भाजपचे कोणतेही मंत्री राजनामे देणार नाहीत. मात्र अतिरीक्त खाती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आहे. परंतु त्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. नव्या मंत्र्यांना देण्यात येणार्‍या खात्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आल्यानंतर तातडीने नव्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच संकेतही शिंदे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आले आहे.

COMMENTS