बिअर बार मध्ये झालेला गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Homeताज्या बातम्या

बिअर बार मध्ये झालेला गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

टोळीने बार मालकाला बेदम मारहाण केली

यवतमाळ प्रतिनिधी/  यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस गेल्या काही दिवसांत वाढला आहे. अशाच एका टोळीने एका बार मध्ये हवेत गोळीबार करीत गोंधळ घा

विजय शिवतारे ICU त दाखल ; कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता प्रदूषणामुळे ढासळली
जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी : जय हिंद फाउंडेशनची मागणी

यवतमाळ प्रतिनिधी/  यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस गेल्या काही दिवसांत वाढला आहे. अशाच एका टोळीने एका बार मध्ये हवेत गोळीबार करीत गोंधळ घातला. शिवाय बार मालकाला बेदम मारहाण करीत त्यांचेवर काचेच्या शिश्या व ग्लास भिरकावून तोडफोड केली. गुंडगिरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. छोटी गुजरीत असलेल्या बार मध्ये दारू पित असलेल्या सात गुंडांना बार चालक लकी जयस्वाल यांनी बार बंद करण्याची वेळ झाल्याचे सांगून, बिलाचे पैसे मागितले यावरून गुंडांच्या टोळीने लकी जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिसांना वेळीच सूचना दिल्यानंतर पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने आरोपी पसार होण्यात यशस्वी झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. शहरात गुंड टोळींमध्ये सशस्त्र हल्ले व त्यांचा हैदोस वाढल्याने नागरिक दहशतीत आहे.

COMMENTS