Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-शिवराज पवार

शिरसमार्ग येथे तीन कोटींच्या कामाचे उद्घाटन, रस्ता प्रश्न मार्गी

गेवराई प्रतिनिधी - गेवराई मतदार संघातील विकास कामांसाठी आमदार लक्ष्मण आण्णा पवार हे निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास युवा नेते शिवराज दादा प

तवांग सीमेवर भारत-चीन सैनिकांत चकमक
ठाकरे कुटुंबियांच्या कथित संपत्तींची प्राथमिक चौकशी सुरु
अहमदनगर : साखरपुडा वा लग्नासाठी आता परवानगी गरजेची ; जिल्ह्यातील आठवडे बाजार केले बंद

गेवराई प्रतिनिधी – गेवराई मतदार संघातील विकास कामांसाठी आमदार लक्ष्मण आण्णा पवार हे निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास युवा नेते शिवराज दादा पवार यांनी व्यक्त केला. ते गेवराई तालुक्यातील शिरस मार्ग येथे अडीच कोटी रुपयांच्या रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेसाहेब  पवळ, कल्याणराव पवाळ, अनिल पवळ,  शाम कुंड , बाळासाहेब सानप, पवन गावडे, रमेश  तळेकर, माजी सरपंच बिबीशन मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिरसमार्ग येथील प्रमुख रस्त्याची गेल्या वीस वर्षापासून अतिशय दुरावस्था झाली होती. सर्व रस्ता चिकलमय झाल्याने वाहन चालकांची मोठे हाल होत होते. सदरील रस्ता दुरुस्त करावा यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला मात्र हा रस्ता होत नसल्याने रहदारीस अनेक अडथळे येत होते. गेल्या काही दिवसापूर्वी या रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या कडे व्यक्त केला होता. यानंतर हा रस्ता करण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले होते. सिरसमार्ग येथील बाजार तळावरील मुख्य रस्त्यासाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे उद्घाटन युवा नेते शिवराज  पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना युवा नेते शिवराज  पवार म्हणाले की, गेवराई मतदार संघातील विकास कामांसाठी आमदार लक्ष्मण  पवार सतत निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असतात, या प्रयत्नातूनच त्यांनी सिरसमार्ग येथील मुख्य रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये तसेच तरटेवाडी येथील अंगणवाडीसाठी दहा लाख रुपये , सिरसमार्ग येथील दलित वस्तीतील रस्त्यासाठी दहा लाख रुपये असा निधी उपलब्ध करून दिला आहे, यापुढे सिरसमार्ग व परिसरातील विकास कामासाठी तसेच मतदारसंघातील विकास कामासाठी आमदार लक्ष्मण पवार निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वासही यावेळी शिवराज दादा पवार यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद मगर  यांनी केले तर प्रास्ताविक भारतराव तांबारे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास धुराजी बाबा कोळेकर, ज्ञानेश्वर माऊली चव्हाण, दत्तोपंत रक्षे, बबनदेवा जोशी, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जाधव, माजी सरपंच महारुद्र वखरे , दिनेश गुळवे, शंकर गोयकर संजय परदेशी अचितराव पवाळ, दिमाखवाडी येथील युवा कार्यकर्ते कृष्णा पवार आदींसह शिरसमार्ग तरटेवाडी काळेवाडी व परिसरातील शेतकरी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळेवाडी रस्ता करावा: गुळवे
यावेळी कार्यक्रमात बोलताना सिंदफणा अर्बन निधीचे चेअरमन दिनेश गुळवे म्हणाले की व्यापारपेठेसाठी व शेतकर्‍यांसाठी शिरास मार्ग काळेवाडी टाकळगव्हाण हा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता नसल्याने याचा व्यापार पेटीवर मोठा परिणाम झाला आहे. यासह शेतकरी तसेच काळेवाडी मानकापूर टाकळगव्हाण या ठिकाणी ग्रामस्थ रुग्ण यांना ये जा करण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागतात. शिरस मार्ग येथील व्यापार पेटला मिळावे व शिरसमार्ग काळेवाडी तरटेवाडी येथील शेतकरी ग्रामस्थांच्या हाल होऊ नये यासाठी हा रस्ता करावा अशी आग्रहाची मागणी यावेळी दिनेश गुळवे यांनी केली.

COMMENTS