Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : साखरपुडा वा लग्नासाठी आता परवानगी गरजेची ; जिल्ह्यातील आठवडे बाजार केले बंद

कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादूर्भाव पाहून जिल्हा प्रशासनाने काही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान
मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल – प्रा.दासू वैद्य.
तीन वर्षांनी 5 लाखांचे दागिने मिळाले…डोळ्यांत आनंदाश्रू दाटले…

अहमदनगर : कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादूर्भाव पाहून जिल्हा प्रशासनाने काही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. साखरपुडा वा लग्न समारंभासाठी आता संबंधित पोलिस ठाण्याची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा या सारख्या धार्मिक व कौटुंबिक समारंभाच्या आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता कौटुंबिक समारंभांसाठीही पोलिस परवानगी अत्यावश्यक करण्यात आली आहे. जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीतजास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, ही अट पाळली जात नाही. त्यामुळे लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल आणि इतर समारंभाचे ठिकाणी 50 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सिमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्‍या मंगल कार्यालयांना 10 हजार रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा यासारख्या धार्मिक व कौटुंबिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

आठवडे बाजार बंद

जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक 29 मार्चपासून ते 15 एप्रिल, 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी व शेतकर्‍यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट

नव्या 829 बाधितांची भर

जिल्ह्यात शुक्रवारी 643 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 82 हजार 739 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.06 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 829 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4985 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 205, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 404 आणि अँटीजेन चाचणीत 220 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 90, अकोले 01, जामखेड 1, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 5, नेवासा 13, पारनेर 10, पाथर्डी 1, राहुरी 2, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 4 आणि कँटोन्मेंट बोर्ड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 124, अकोले 4, जामखेड 2, कर्जत 2, कोपरगाव 20, नगर ग्रामीण 41, नेवासा 12,  पारनेर 21, पाथर्डी 4, राहाता 70,  राहुरी 12, संगमनेर 33, शेवगाव 1, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 40, कॅन्टोन्मेंट 8 आणि  इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 220 जण बाधित आढळून आले. मनपा 25, अकोले 22, जामखेड 1, कर्जत 30, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 28, नेवासा 27, पारनेर 17, पाथर्डी 24,  राहाता 12, राहुरी 16, संगमनेर 4, शेवगाव 1, श्रीरामपूर 11 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 195, अकोले 11, जामखेड 17, कर्जत 6, कोपर गाव 48, नगर ग्रामीण 41, नेवासा 26, पारनेर 8, पाथर्डी 23, राहाता 64, राहुरी 38, संगमनेर 43, शेवगाव 31,  श्रीगोंदा 12,  श्रीरामपूर 47, कॅन्टोन्मेंट 2 आणि इतर जिल्हा 31 अशा रुग्णांचा समावेश आहे.

COMMENTS