Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा 42 वा सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सव श्री व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेच्या श्री व्यंकटेश्‍वरा कॉलेज

शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान ही संकल्पना सर्वोत्तम ठरेल – प.पू.डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा 42 वा सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सव श्री व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेच्या श्री व्यंकटेश्‍वरा कॉलेज ऑफ सायन्स, पेठ प्रांगणात आयोजित केला आहे. यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असून जवळपास 58 महाविद्यालयातील 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती श्री व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी दिली.
जोशी म्हणाले, यामध्ये 15 कला प्रकार सादर करणेत येणार असून लोकसंगीत वाद्य वृंद, समूह गीत, नकला, मराठी वक्तृत्व, हिंदी वक्तृत्व, इंग्रजी वक्तृत्व, पथनाट्य, एकांकिका, विवाद, लोककला, सुगम गायक, मूकनाटय, प्रश्‍नमंजुषा, लोकनृत्य व लघुनाटीका असे प्रकार सादर करणेत येणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या संयोजन समितीचे डॉ. आर. व्ही. गुरव, डॉ. बी. व्ही. ताम्हणकर, डॉ. पी. एम. माने, डॉ. आर. जी. कुलकर्णी व प्रा. निलेश डामसे यांनी महाडीक शैक्षणिक संकुलास भेट देऊन पाहणी केली. युवा महोत्सवाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच प्र. कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे तसेच संस्थेचे सचिव राहुल महाडीक, उपाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
युवा महोत्सवाचे संयोजन श्री व्यंकटेश्‍वरा कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. समीर नदाफ, प्रा. सौ. एस. एस. भोसले, प्रा. आर. जी. नायकवडी, प्रा. एन. बी. आपुगडे, प्रा. एम. आर. मुल्ला, प्रा. एच. व्ही. पाटील, प्रा. एस. बी. पवार व प्रा. आदर्श पाटील हे करत आहेत.

COMMENTS