Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्या विरोधात कारवाईसाठी खंडाळ्यात शिवसेनेचे आंदोलन

खंडाळा : शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले.(छाया-सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत ही युध्दनौका वाचवण

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची उद्या प्रकट मुलाखत
अनामत रक्कम न भरलेल्या 51 ठेकेदारांना सांगली मनपा सीईओंची नोटीस

लोणंद / प्रतिनिधी : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक, उद्योजक,
कंपन्या यांचेकडून करोडो रुपये निधी गोळा केला होता व ते जमलेले अंदाजे 57 कोटी रुपये त्यांनी राजभवनला सन्माननीय राज्यपाल महोदयांकडे जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू आजतागायत ते जमा केले नाहीत असे ीींळ द्वारे मिळालेल्या माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. तरी महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक केलेप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करणे कामी खंडाळा पोलिस स्टेशनला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोनि महेश इंगळे यांचेकडे निवेदन दिले.
निवेदन देताना शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शारदा जाधव, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, तालुकाप्रमुख अंकुश पवार, आदेश जमदाडे, उपतालुकाप्रमुख सचिन आवारे, खंडाळा शहरप्रमुख गोविंद गाढवे, लोणंद शिवसेना नेते विश्‍वासअण्णा शिरतोडे, कुसुम शिरतोडे, अमोल गाढवे, मंगेश खंडागळे, मंदार वेदपाठक, रियाज शेख आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना शारदा जाधव यांनी किरीट सोमय्या यांचेवर आर्थिक अपहार करून महाराष्ट्राची फसवणूक केलेने त्यांचेवर कारवाई करणेची मागणी केली.

COMMENTS