लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केले

नेवासाफाटा प्रतिनिधी लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केल्याबद्दल व दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल नेवासा जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सुनील हापसे या

विशेष मोक्का न्यायालयाने केली दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ
पर्यावरण दूत बबनराव डहाळे यांचा गौरव  
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम

नेवासाफाटा प्रतिनिधी

लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केल्याबद्दल व दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल नेवासा जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सुनील हापसे यांचा गौरव यावेळी करण्यात आला.सुनील हापसे यांनी केलेल्या प्रामाणिकपणाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचे स्वीय सहायक पी.आर.जाधव हे जिल्हा बँकेमध्ये लॉकरमधून दागिने काढण्यासाठी आले असता एक मौल्यवान दीड तोळयाचा अंदाजे पंच्याहत्तर हजार सोन्याचा दागिना खाली पडला तो मात्र जाधव यांच्यानिदर्शनास आला नाही जिल्हा बँकेचे शाखाधिकारी

सुनील हापसे यांनी पी आर जाधव यांना विचारणा केल्यानंतर त्यांची सौ.मोहिनी पंढरीनाथ जाधव यांनी सदरचा दागिना माझाच असल्याचे सांगितले.खात्री पटल्यानंतर सदरचा मौल्यवान दागिना सुनील हापसे यांनी जाधव दाम्पत्यांकडे सुपूर्त केला.

शाखाधिकारी सुनील हापसे यांच्या प्रामाणिक

पणाबद्दल छोटेखानी कार्यक्रमात बँकेचे तालुका विकास अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व सुनील हापसे यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.

यावेळी पी.आर.जाधव म्हणाले की जेष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब व नामदार शंकरराव गडाख यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करीत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना शिस्त व संस्काराची शिदोरी दिली त्यांनी दिलेल्या शिकवणूकीमुळेच आज अधिकाऱ्याच्या प्रामाणिक पणाचे खरे दर्शन झाले असल्याचे सांगून त्यांनी शाखाधिकारी सुनील हापसे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

यावेळी नेवासा जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकारी बाळासाहेब वाकचौरे,जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण,युवा नेते अनिलराव ताके,बँकेचे कॅशियर विकास बैसाने,लेखापाल स्वप्नाली पाटील,बँकेचे कर्मचारी नसीर शेख उपस्थित होते.

COMMENTS