Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? : भास्करराव पेरे-पाटील यांचा सवाल

कराड / प्रतिनिधी : शासकीय योजनांच्या भरवश्यावर राहू नका. ज्याच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे. ते काहीही करतील. शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला

सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर युवकाचे विषप्राशन
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

कराड / प्रतिनिधी : शासकीय योजनांच्या भरवश्यावर राहू नका. ज्याच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे. ते काहीही करतील. शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात एकही योजना नव्हती. तरी समाज सुखी होता. त्यासाठी गावानेच गावचे प्रश्‍न सोडवा. अशा सुविद्या द्या लोक तुमच्याकडे पैसे भरायला घेऊन येतील. आमच्या गावाने तेच केले आहे, असा सल्ला पाटोदा आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या माध्यमातून शंकरराव खबाले युवा प्रतिष्ठानतर्फे ग्रामपंचायतीला 10 लाख रूपये खर्चातून रूग्णवाहिका, वॅाटर टँकर, वाचानालय पुस्तके, फ्लोअर मिल, मिरची कांडप यंत्र, शेवया मशिन भेट वस्तू लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, रयतचे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष आप्पासाहेब गरूड, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सौ. निलमताई येडगे, इंद्रजीत चव्हाण, सौ. विद्याताई थोरवडे, सौ. मंगलाताई गलांडे, सरपंच शुभांगीताई खबाले, अशोकराव पाटील पोतलेकर, उत्तमराव पाटील. सौ. विजयाताई माने, शंकरराव लोकरे, सौ. पुष्पाताई महिपाल, राजेंद्र चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संपतराव खबाले, ग्रामपंचायत सदस्य विविध गावचे सरपंच व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

पेरे-पाटील म्हणाले, आठशे कुटूंबाचे आमचे गाव आहे. वर्षाला पाच हजार वर कुंटूब कर भरते. चाळीस लाख जमा होतात. शंभर टक्के पैसे जमा होतात. वर्षाकाठी 30 लाख सुविद्यावर खर्च होतात. 10 लाख शिल्लक राहतात. गावाला चार प्रकारचे पाणी आहे. त्यात एका कुंटूबाला 20 लीटर आरोचे पाणी आम्ही देतो. सकाळी चार तास नळाला गरम पाणी आम्ही देतो. महिलेचा वेळ त्यामुळे वाचतो. पिठाची गिरणी आहे. वर्षभर दळण फुकट देतो. संपुर्ण गावाला वायफाय सुविद्या मोफत आहे. अक्क्या गावच्या महिलांना वर्षभर सॅनिटायझर नॅपकीन मोफत देतो. पैसे बचत होतात. शेती करायला टॅक्टर आहे. 30-35 टक्के शेतकर्‍यांना अनुदान देतो. अनुदान देणारी देशातली पहिली ग्रामपंचायत आमची आहे. आपल्याकडे शेतकरी मेल्यावर पैसे दिले जाते. तो जिवंत राहण्यासाठी द्या, असे सांगताना गावाला स्वच्छ पाणी द्या, फळझाडे लावा, स्वच्छता ठेवा, शाळा नीटनेटक्या ठेवा, मुलांना शिक्षण चांगले द्या. निराधाराना आधार द्या, त्यासाठी वृध्दाश्रम काढा. एवढ्या सुविद्या दिल्यावर कुणाच्या दारात जायची गरज पडणार नाही. प्रास्ताविक शंकरराव खबाले यांनी केले. बाबुराव खबाले यांनी आभार मानले.

COMMENTS