Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापगड कारखान्याच्या 21 जागांसाठी 83 उमेवारांचे अर्ज दाखल

कुडाळ / वार्ताहर : सोनगाव, ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवाषिर्क निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवश

तहसीलदारांची राजपथ इन्फ्रावर धडक कारवाई: आठ कोटी रॉयल्टी थकविल्याने वाहनांसह मशिनरी सील
शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ

कुडाळ / वार्ताहर : सोनगाव, ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवाषिर्क निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी एकूण 83 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी असून यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
गुरुवार, दि. 10 रोजी शेवटच्या दिवशी प्रतापगड कारखाना गट, प्रतापगड बचाव पॅनेल व अन्य अपक्ष यांच्याकडून दाखल झालेल्या अर्जानुसार 21 जागांसाठी 83 एवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. कुडाळ गटातील 3 जागांसाठी एकूण 12 अमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. खर्शी सायगांव गटातून 3 जगांसाठी एकूण 13 उमेदवारी अर्ज, हुमगांव गटातून 3 जागांसाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज तर मेढा गटातून 3 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज, महाबळेश्‍वर गटातून 3 जागांसाठी एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थेतून 1 जागेसाठी 5 उमेदवारी अर्ज, महिला राखीव गटातून 2 जागांसाठी एकूण 5 उमेदवारी अर्ज तर अनुसूचित जाती व जमाती राखीव गटातून 1 जागेसाठी एकूण 5 अर्ज, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव गटातून 1 जागेसाठी एकूण 4 उमेदवारी अर्ज तर इतर मागास प्रवर्गातून 1 जागेसाठी एकूण 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS